दोन गटातील मारहाणप्रकरणी २२ जणांवर गुन्हा
By Admin | Updated: May 23, 2016 01:24 IST2016-05-23T01:24:51+5:302016-05-23T01:24:51+5:30
पिंप्री खरबी येथील घटनेत दोन गंभीर जखमी.

दोन गटातील मारहाणप्रकरणी २२ जणांवर गुन्हा
मंगरुळपीर (जि. वाशिम): तालुक्यातील पिंप्री खरबी येथे शेतात वहिवाटीच्या रस्त्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २0 मे रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. या हाणामारीत पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले असून, परस्परविरोधी तक्रारीवरून मंगरुळपीर पोलिसांनी दोन्ही गटांतील मिळून २२ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राहुल सुरेश ठाकरे रा. पिंप्री खरबी याने फिर्याद दिली की, सिद्धार्थ सोनोने, गौतम सोनोने, भीमराव सोनोने, देवीदास कांबळे, चंदन कांबळे, प्रल्हाद ठाकरे, राजेश ठाकरे, भानुदास ठाकरे, विठ्ठल ठाकरे यांनी शेतीचे रस्त्याचे कारणावरून गैर कायद्याची मंडळी जमवून एकत्र येऊन नमूद आरोपींतांनी फिर्यादीच्या वडिलास व मोठी आई यांना काठय़ाने व गोट्याने मारहाण करून गंभीर जखमी करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला व जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले, अशा फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. तर दुसर्या गटातील फिर्यादी पुरुषोत्तम ठाकरे रा. पिंप्री खरबी यांनी पोलिसात फिर्याद दिली की, रुपेश ठाकरे, संतोष ठाकरे, गुलाब ठाकरे, गजानन ठाकरे, गोपाल ठाकरे, सुरेश ठाकरे, रामधन ठाकरे, विष्णू ठाकरे, नाजूक सावके यांनी फिर्यादी हा त्याचे घरासमोर बसला असता शेतात जाण्याचे रस्त्याचे कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून जाण्याचे रस्त्याचे कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व त्याच्या सोबतच्या लोकांवर रॉकेल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशा फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.