२२ कर्मचार्‍यांचे रक्तदान

By Admin | Updated: August 4, 2014 00:23 IST2014-08-04T00:23:30+5:302014-08-04T00:23:30+5:30

महसुल दिनी अभीनव उपक्रम कार्यक्षमता वाढविण्यासह उपाययोजनांवर भर

22 employees blood donation | २२ कर्मचार्‍यांचे रक्तदान

२२ कर्मचार्‍यांचे रक्तदान

वाशिम : महसुल विभागातील कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढविण्यासह त्यांच्या कामाचे स्वरुप व ताण या बाबींचा विचार करुन त्यावर उपाययोजना राबाविणा राबविण्याच्या दृष्टीने वाशिम तहसीलच्यावतीने १ ऑगस्ट या महसुल दिनी महसुल कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये २२ कर्मचार्‍यांनी रक्तदान केले. दिन आयोजनाच्या उद्देशापासून महसुल दिन भरकटत चालल्याचे वृत्त लोकमतने १ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले होते. याच वृत्तात वाशिम तहसीलने महसुल दिनाच्या उपक्रमाला कर्मचार्‍याभीमुख बनविण्यासाठी वाशिम तहसीलने पावले उचलल्याचे व त्याला व्यापक स्वरुप देण्याची गरज स्पष्ट केली होती. १ ऑगस्ट रोजी दोन सत्रात वाशिम तहसीलच्यावतीने नियोजीत उपक्रम राबविण्यात आला. पहिल्या सत्रात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात रक्तदानासाठी ३३ कर्मचार्‍यांनी नोंदणी केली. परंतू त्यामधील ११ जणांना शुगर वा बी.पी. चा आजार असल्याचे समोर आल्याने २२ जणांनी रक्तदान केले. दूसर्‍या सत्रात आहार व आरोग्याविषयी प्रबोधनपर शिबिर घेण्यात आले. आरोग्याविषयी मार्गदर्शशन करताना योगासनाची उपयोगिता यासंदर्भात योगतज्ज्ञ रामभाउ छापरवाल यांनी महसुल अधिकारी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बी. पी. वा शुगरचा आजार असलेल्या कर्मचार्‍यांनी कोणती योगासने करावी व कोणती करु नये यासंदर्भात मार्गदर्शन केले. आहारविषयक मार्गदर्शनपर शिबिरात आहारतज्ज्ञ डॉ. लिना चितलांगे यांनी आपला आहार कसावा, आपण नेमके काय खावे, किती प्रमाणात खावे, काय खावू नये याविषयी उपस्थित अधिकारी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करुन अधिकारी कर्मचार्‍यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. उपक्रमाच्या शेवटच्या सत्रात राष्ट्रीय भूमिअभिलेखाचे जतन कार्यक्रमांतर्गत भूमि अभिलेख कार्यालयातील महत्वाच्या दस्तऐवजाचे स्कॅनिंग करुन संगणकात साठवून ठेवण्याच्या कार्याचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार यांच्या हस्ते अप्पर जिल्हाधिकारी एल. बी. राउत, तहसीलदार आशिष बिजवल व भूमी अभिलेख उपअधीक्षक हांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या उपक्रमाचे संचलन तलाठी संघटनचे जिल्हाध्यक्ष श्याम जोशी यांनी तर पीपीटी सादरिकरणाचे काम निवासी नायब तहसीलदार निलेश मडके यांनी केले. या उपक्रमाला वाशिम तहसील अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी कर्मचार्‍यांनी लाभ घेतला.

Web Title: 22 employees blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.