३१९१ शेतक-यांना २२ कोटींचे कर्ज वाटप!
By Admin | Updated: April 20, 2017 16:02 IST2017-04-20T16:02:15+5:302017-04-20T16:02:15+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वाटपाची गती वाढविली असून एकट्या रिसोड तालुक्यात १९ एप्रिलअखेर ३१९१ शेतकºयांना २२ कोटींचे २२ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले.

३१९१ शेतक-यांना २२ कोटींचे कर्ज वाटप!
वाशिम : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वाटपाची गती वाढविली असून एकट्या रिसोड तालुक्यात १९ एप्रिलअखेर ३१९१ शेतकऱ्यांना २२ कोटींचे २२ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले.
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकोला व वाशिम जिल्ह्यात एकंदरित ११२ शाखा असून त्यातील ६० शाखांमार्फत एटीएम यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे. यंदा शेतकऱ्यांना एटीएमव्दारे कर्जपुरवठा करण्याचे धोरण ठरले आहे. त्यानुसार, मोप, लोणी, आसोला, चाकोली, बोरखेडी, लोणी खु. येथील शेतकऱ्यांनी एटीएमची मागणी लावून धरली होती. त्याची दखल घेवून मोप या तुलनेने लोकसंख्या अधिक असलेल्या गावात एटीएम कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष वामनराव देशमुख यांनी दिली.