शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरात कोरोना काळात संकलित झाला २१६ मेट्रिक टन जैविक कचरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 11:41 IST

BioWaste in Washim प्रतिमाह ४ ते ५ मेट्रिक टनने वाढ झाल्याचे नगर परिषदमध्ये कचरा संकलनाच्या नाेंदीवरून दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  काेराेना संसर्ग काळात वाशिम शहरात २१६ मेट्रिक टन जैविक कचरा जमा करण्यात आला असून, यामध्ये प्रतिमाह ४ ते ५ मेट्रिक टनने वाढ झाल्याचे नगर परिषदमध्ये कचरा संकलनाच्या नाेंदीवरून दिसून येते.वाशिम शहरात २५ घंटागाड्यांसह ८ ट्रॅक्टरद्वारे जैविक कचऱ्याचे संकलन केल्या जाते. काेराेनापूर्वी वाशिम शहरात १८ ते २० मेट्रिक टन कचरा संकलित व्हायचा. मार्च महिन्यानंतर या कचऱ्यात २२ टक्क्यांनी वाढ हाेऊन प्रतिदिन ५ मेट्रिक टन कचरा वाढल्याचे दिसून येत आहे. काेराेनाकाळातील ९ महिन्यांमध्ये प्रतिदिन २४ ते २५ मेट्रिक टन कचऱ्यानुसार ९ महिन्यांमध्ये २१६ मेट्रिक टन खत संकलित करण्यात आले. जे काेराेनापूर्वी ९ महिन्यांचा विचार करता १८० मेट्रिक टन हाेते. यामध्ये ३६ मेट्रिक टनाने वाढ झाल्याचे दिसून येते. वाशिम शहरामध्ये नगर परिषदेच्यावतीने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर काेणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. यासंदभार्त संबंधितांशी चर्चा केली असता कचरा टाकणारा व्यक्ती दिसून येत नसल्याने कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. जानेवारी महिन्यापासून याबाबत माेहीम सुरू करण्यात आली असून दंडात्मक व फाैजदारी कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले 

काेराेनाकाळात दरमहा वाढला ४ टन कचराकाेरानापूर्वी दरमहा २० टन कचरा नगर परिषदेतर्फे जमा केला जायचा.    मार्चपासून लाॅकडाऊन व काेराेनाकाळामध्ये दरमहा २४  टन कचरा जमा झाला. यामध्ये प्रत्येक महिन्याला ३ ते ४ टन कचऱ्यात वाढ झाल्याची माहिती नगर परिषदेच्या आराेग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

काेराेनाचा संसर्ग पाहता नगरपरिषदेतर्फे घंटागाडीद्वारे जैविक कचरा संकलन केला जातो. काही नागरिक कचरा रस्त्यावर टाकतात. त्यांच्यावर न.प.तर्फे जानेवारी महिन्यापासून दंडात्मक व फाैजदारी कारवाई करण्यात येणार आहे.- जितु बढेल,आराेग्य निरिक्षक, न.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या