वाशिम जिल्हय़ात २१२ टपाली मते अवैध
By Admin | Updated: October 22, 2014 00:37 IST2014-10-22T00:26:47+5:302014-10-22T00:37:35+5:30
कारंजा-मानोरा मतदारसंघातील सर्वाधिक टपाल मतं अवैध.

वाशिम जिल्हय़ात २१२ टपाली मते अवैध
दादाराव गायकवाड / कारंजा लाड (वाशिम)
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वाशिम जिल्हय़ातील तिन्ही मतदार संघात झालेल्या टपाली मतदानात २१२ मते अवैध ठरली आहेत. यामध्ये कारंजा-मानोरा मतदार संघ आघाडीवर असून, येथे १११ टपाली मतू अवैध ठरली आहेत. सुशिक्षीत आणि सुज्ञ मतदारांकडून झालेंली ही चूक सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वाशिम जिल्हय़ातील वाशिम-मंगरुळपीर, रिसोड-मालेगाव आणि कारंजा-मानोरा या तिन्ही मतदार संघात मिळून २१२ टपाली मते अवैध ठरली, तर तीन टपाली मतपत्रिकावर नोटाचा उल्लेख होता. वाशिम-मंगरुळपीर मतदार संघात निवडणूक विभागाला प्राप्त झालेल्या ९0९ टपाली मतांपैकी एकूण ७२0 मते वैध ठरली, तर ८९ मते अवैध ठरली. रिसोड-मालेगाव मतदार संघात निवडणूक विभागाला प्राप्त झालेल्या ११0९ टपाली मतापैंकी एकूण १0८४ मते वैध ठरली, तर २२ मते अवैध ठरली आणि उर्वरित तीन मते ह्यनोटाह्णची होती. कारंजा-मानोरा मतदार संघाचा विचार करता या मतदार संघातील बाहेरगावी निवडणूक कामानिमित्त नियुक्त असलेल्या मतदारांना एकूण १३७६ टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या. त्यापैकी ११३0 मतपत्रिका निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या. यामध्ये ९२३ मते वैध ठरली, तर उर्वरित १११ मते अवैध ठरली. ही बाब निश्चितच विचार करण्यासारखी आहे. या मतदार संघातील निवडणूक विभागाकडून जारी करण्यात आलेल्या टपाली मतपत्रिकांपैकी २४२ मतपत्रिका निवडणूक विभागाला प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवसापर्यंत प्राप्तच झाल्या नाहीत. विविध कारणांमुळे या मतपत्रिका निवडणूक विभागापर्यंत पोहोचण्यात विलंब झाल्याने त्यांना काहीच अर्थ राहिला नाही. संबंधित अधिकारी, कर्मचार्यांच्या धिसडघाईने टपाली मतदान अवैध ठरल्यामुळे उमेदवारांचे मात्र थोडे नुकसानच झाले आहे.