रामनवमीनिमित्त लावले २१ पानवठे!
By Admin | Updated: April 5, 2017 13:48 IST2017-04-05T13:48:48+5:302017-04-05T13:48:48+5:30
राम नवमीच्या निमित्ताने शहरातील विविध वसाहतीमध्ये वसलेल्या मंदीर परीसरात पानवठे बसविन्यात आले.

रामनवमीनिमित्त लावले २१ पानवठे!
वाशिम: स्थानिक सावली प्रतिष्ठानच्यावतीने १९ मार्चपासून शहरात विविध निर्जळ ठिकाणी पक्षांसाठी पानवठे बसविने सुरु आहे. राम नवमीच्या निमित्ताने शहरातील विविध वसाहतीमध्ये वसलेल्या मंदीर परीसरात पानवठे बसविन्यात आले.
सुंदर वाटिकेमधील साई मंदीर परीसर,गायत्री भवन, हनुमान मंदीर , शिवाजी नगर काटा रोड येथिल हनुमान मंदीर. गजानन महाराज मंदीर त्यासोबत सिव्हिल लाईन परीसरातील हनुमान मंदिर, विश्वेश्वर महादेव मंदीर ,कारागृह परीसरातील मंदीर ईत्यादी ठिकाणी सावली प्रतिष्ठानच्या वतीने एकुन २१ पानवठे लावन्यात आले. सोबतच रामफळाच्या वृक्षाना देखिल पानवठे लावन्यात आले. सावली प्रतिष्ठानच्या वतीने टप्प्या टप्प्याने पानवठे लावन्याचे काम सुरु असुन आठवड्यातुन दोन वेळा त्यामधील पाणी बदलल्या जाते. तसेच या उपक्रमा अंतर्गत वाशीमकर जनतेला आवाहन करन्यात येत की कमी उंचीच्या ठिकाणच्या पानवठ्यात पाणि भरुन प्रतिष्ठानला सहकार्य करावे. सेल्फी विथ फीडर अंतर्गत पानवठ्यात पाणी भरतानाचा फोटो नागरीकानी प्रतिष्ठानच्या लिंकवर जावुन माहीती भरुन पाठवावी अशी माहिती सावलीचे संयोजक राम धनगर यांनी दीली.
सदर उपक्रम राबविन्यासाठि वैभव मुकुंद गौरकर, प्रवीण होनमने, सुनील हेंद्रे,दिगांबर घोडके , बंडु गव्हाणे,शंकर देवराव कालापाड, रुपाली बाभने रोहिदास धनगर, रूपेश काबरा,अजय यादव ,रश्मि मोहटे, संगिता धनगर,निखिल मोहटे,रुशाली बाभणे, सुरज धनगर ईत्यादी सावली प्रतिष्ठानचे स्वयंसेवक परीश्रम घेत आहेत