राम मंदिर निर्माण कार्यासाठी २० हजारांचा निधी समर्पित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:18 IST2021-03-04T05:18:22+5:302021-03-04T05:18:22+5:30

अयोध्या येथे उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरासाठी विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात निधीचे संकलन होत आहे. रामभक्त सढळ हाताने या मंदिराच्या ...

20,000 dedicated for construction of Ram temple | राम मंदिर निर्माण कार्यासाठी २० हजारांचा निधी समर्पित

राम मंदिर निर्माण कार्यासाठी २० हजारांचा निधी समर्पित

अयोध्या येथे उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरासाठी विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात निधीचे संकलन होत आहे. रामभक्त सढळ हाताने या मंदिराच्या उभारणीसाठी मदत करीत असून, उंबर्डा बाजार येथील रामभक्तांनीही २० हजार रुपयांचा निधी मंदिरासाठी संकलित केला. हा निधी भागवताचार्य अवधूत महाराज रणमाळे यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कारंजा तालुका महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख अक्षय वानखडे यांच्या स्वाधीन करण्यात आला. यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष राजू पाटील गाडवे, ग्रा.पं. सदस्य भारत कानडे, राहुल घोडे, गोपाल घोडे तथा अन्य सहकारी मंडळी उपस्थित होती.

----------------

बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी

उंबर्डा बाजार : येथे गत दोन दिवसांत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या माहितीचे संकलन झाल्यानंतर २१ जणांची कोरोना चाचणी सोमवारी करण्यात आली.

Web Title: 20,000 dedicated for construction of Ram temple