२00 जणांना अतिसाराची लागण

By Admin | Updated: October 26, 2014 00:25 IST2014-10-26T00:25:30+5:302014-10-26T00:25:30+5:30

तांदळी शेवई ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा.

200 people get diarrhea infection | २00 जणांना अतिसाराची लागण

२00 जणांना अतिसाराची लागण

वाशिम: यंदाच्या पावसाळ्यात विहिरीला नवीन पाणी आले; परंतु ग्रामपंचायत प्रशानाने विहिरीत ब्लिचिंग पावडरच टाकली नाही. तसेच आरोग्य विभागानेदेखील गावात कुठल्याही प्रकारचे आरोग्याच्या काळजीबाबत सुविधा पुरवल्या नसल्याने तांदळी शेवई येथील जवळ पास २00 जणांना अतिसाराची लागण झाली असून, त्यांच्यावर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तांदळी शेवई येथील ग्रामपंचायत प्रशासन हे गावाच्या स्वच्छतेबाबत उदासीन आहे. गावा तील नाल्या गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी घाण पाणी तुंबले असून, रस्त्यावर येणार्‍या घाण पाण्यामुळे गावात डासाची उत्पत्ती वाढली आहे. तसेच ठिकठिकाणी कचर्‍याचे व घाणीचे ढिगारे साचले आहेत. स्वच्छतेबाबत ग्रामपंचायत प्रशासन कुठल्याच ठोस उपाययोजना राबवत नाही. तसेच पार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तांदळी शेवई येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यरत असले तरी या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कधीच हजर नसतात. वास्तविक पाहता उपकेंद्रातील अधिकार्‍यांनी गावात आरोग्याबाबत जनजागृती करायला पाहिजे. तसेच पाण्याचे नमुने घेऊन पाणी पिण्यायोग्य आहे की, नाही याचीदेखील चाचपणी करायला पाहिजे होती. तसेच गावात घरोघरी जाऊन ग्रामस्थांच्या रक्ताचे नमुने त पासणे तेवढेच गरजेचे आहे; परंतु आरोग्य विभागाच्या वतीने अशा कुठल्याही प्रकारच्या उ पाययोजना राबविण्यात आल्या नाहीत.
तांदळी शेवई येथील एका भागातील तब्बल २00 ते २५0 जणांना अतिसाराची लागण झाली आहे. त्यामध्ये लहान बालकांचादेखील बर्‍यापैकी समावेश आहे. याबाबत पार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांनी सदर आजार हा दूषित पाण्यामुळे झाल्याचे सांगितले.

*अधिकारी व सचिवावर कार्यवाहीची मागणी
जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने निष्काळजीपणा दाखवणार्‍या ग्रामपंचायत सचिव व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी जि. प. सदस्य विजया मानमोठे यांनी केली आहे.

 

Web Title: 200 people get diarrhea infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.