पाण्यात बुडून २0 वर्षीय युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: September 20, 2016 01:09 IST2016-09-20T01:09:52+5:302016-09-20T01:09:52+5:30

रिसोड तालुक्यातील घटना.

20 year old youth dies after drowning in water | पाण्यात बुडून २0 वर्षीय युवकाचा मृत्यू

पाण्यात बुडून २0 वर्षीय युवकाचा मृत्यू

रिसोड(जि. वाशिम), दि. १९- तालुक्यातील आसेगाव पेन येथील पैनगंगा नदीच्या पात्रात २0 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार, १९ सप्टेंबर रोजी घडली. याबाबत प्राप्त माहितीनुसार कुंडलिकराव काळे यांनी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की ग्राम आसेगाव पेन येथील २0 वर्षीय युवक ज्ञानेश्‍वर महादू जुमडे याचा पैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: 20 year old youth dies after drowning in water