१९ प्रशिक्षणार्थींंना विषबाधा
By Admin | Updated: March 7, 2016 02:18 IST2016-03-07T02:18:05+5:302016-03-07T02:18:05+5:30
स्टेट बँकेतील प्रकार; शेळीपालन शिबिरातील घटना.

१९ प्रशिक्षणार्थींंना विषबाधा
वाशिम: भारतीय स्टेट बँक अंतर्गत ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत शेळीपालनाचे प्रशिक्षण घेत असलेल्या १९ प्रशिक्षणार्थींंना शनिवारी जेवणातून विषबाधा झाली. यापैकी १२ जण रुग्णालयात भरती आहेत.
स्टेट बँकेच्या जिल्हा ग्रामीण रोजगार व स्वयंरोजगार विभागांतर्गत ३ ते ८ मार्चपर्यंंत शेळीपालनाचे प्रशिक्षण सुरू आहे. उमरी खुर्द व फुलउमरी (ता. मानोरा जि. वाशिम) येथील युवक या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना दररोज नास्ता व जेवण दिल्या जाते. शनिवारी दुपारी ४ वाजता प्रशिक्षणार्थींंनी जेवण केले असता त्यांना शौचास व उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे १९ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये प्रेमसिंग किसन पवार, साहेबराव राठोड, अरविंद राठोड, भाऊराव जाधव, श्याम मोहन चव्हाण, सुरज राठोड, युवराज पांडुरंग राठोड, अतुल नामदेव आडे, संतोष नंदू पवार, विपुल तुकाराम राठोड, विष्णू रामा राठोड, गोकुळ सीताराम राठोड, विलास अनिल पवार (सर्व रा. उमरी खुर्द ता. मानोरा जि. वाशिम), नरेश जाधव, अनिल जाधव, सावंत राठोड, साकेत अशोक राठोड, राजेश उत्तम राठोड, दादाराव देवराव चव्हाण, विकास संतोष राठोड, जीवन बाबाराव राठोड (सर्व रा. फुलउमरी ता. मानोरा जि. वाशिम) यांचा समावेश आहे. यामधील ७ जणांची प्रकृती चांगली झाल्याने त्यांना शनिवारी सुटी देण्यात आली. उर्वरित १२ जण येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. या प्रशिक्षणार्थींंना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.