१९ मंडळांनीच घेतली वीजजोडणी

By Admin | Updated: September 6, 2014 00:04 IST2014-09-05T23:54:14+5:302014-09-06T00:04:54+5:30

वाशिम जिल्ह्यातील एकूण ४९१ गणेश मंडळांपैकी केवळ १९ मंडळानींच वीज जोडणीचा लाभ घेतला

19 Mandal took over electricity connection | १९ मंडळांनीच घेतली वीजजोडणी

१९ मंडळांनीच घेतली वीजजोडणी

वाशिम : घरगुती जोडणीच्या दरापेक्षाही स्वस्त तसेच तात्काळ तात्पुरती वीजजोडणी देण्याच्या वीज वितरण कंपनीच्या उपक्रमाला जिल्य़ातील गणेश मंडळांचा फारसा प्रतिसाद लाभला नसल्याची माहिती उजेडात येत आहे. जिल्ह्यातील एकूण ४९१ पैकी केवळ १९ गणेश मंडळांनीच विज वितरण कं पनीकडून वीजजोडणी घेतली आहे.
धार्मिक सण, उत्सवाच्या काळामध्ये वीज भारनियमनाने भाविकांच्या उत्साहावर पाणी फेरले जावू नये म्हणून भारनियमन बंद केले जाते. या बरोबरच गणेश मंडळांना युनिटच्या नेहमीच्या दराचा आर्थिक फटका बसू नये म्हणून तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीज जोडणीही दिली जाते. घरगुती वीज जोडणीचे युनिटमागे ३ रुपये ३६ पैसे दर आहेत. धार्मिक सण, उत्सवादरम्यानच्या कार्यक्रमस्थळी वीजजोडणी घेतल्यास ३ रुपये २७ पैसे प्रति युनिट याप्रमाणे दर आकारले जातात. घरगुती किंवा व्यावसायिक वीजजोडणीवरुन वीजपुरवठा घेतला तर गणेश मंडळांना जास्त बिल येउ शकते. याउलट अधिकृत वीजजोडणी घेतली तर सुरक्षित व योग्य दाबात आणि स्वस्तात वीज मिळू शकते, या उद्देशाने वीज वितरण कंपनीने राज्यभर हा उपक्रम हाती घेतलेला आहे. हा उपक्रम गणेश मंडळांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृतीपर बैठकही घेण्यात आली होती. स्वस्तात वीजजोडणी देणार्‍या या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता वाघमारे आणि कार्यकारी अभियंता चौरे यांनी केले होते. मात्र, प्रशासनाच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्यातील केवळ १९ गणेश मंडळांनी वीज वितरण कंपनीकडून वीजजोडणी घेतली आहे.
वीज वितरण कं पनीचे कार्यकारी अभियंता जी. डी. चौरे यांनी
गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीज जोडणी देण्याची मोहीम वीज वितरण कंपनीने हाती घेतली असल्याचे सांगीतले. एखाद्याच्या घर किंवा प्रतिष्ठान, वीज वाहिनीच्या तारावर आकोडे टाकून वीज घेतली तर ते धोकादायकही ठरु शकते, याबाबत जनजागृती केली होती. संभाव्य धोका टाळून सुरक्षितपणे गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी, घरगुती वीज जोडणीच्या दरापेक्षाही कमी दराप्रमाणे गणेश मंडळांना अधिकृत वीज जोडणी मिळू शकते, याची पूर्वकल्पना गणेश मंडळांना देण्यात आली होती. जिल्ह्यातील १९ गणेश मंडळांनी या मोहिमेला प्रतिसाद देत वीजजोडणी घेतली असल्याचे त्यांनी सांगीतले.

तालुका              गणेश मंडळ            वीजजोडणी

वाशिम                    118                      02
कारंजा                    101                      13
मालेगाव                   88                    निरंक
मानोरा                     61                    निरंक
मं.पीर                      70                    निरंक
रिसोड                      53                       04


**  वीज महावितरण कंपनीने गणेश मंडळांना वीज जोडणीची पध्दत सोपी केली. पूर्वीही पध्दत अतिशय किचकट होती. गणेश मंडळांना किचकट पध्दतीमुळे वारंवार चकरा माराव्या लागत होत्या त्यामुळे शक्यतोवर गणेश मंडळे दुर्लक्ष करीत होते. ही पध्दत कंपनीच्यावतिने सोपी जरी झाली असली तरी मंडळापर्यंत ही माहिती व्यवस्थितरित्या पोहचलीच नाही.

** धार्मिक सण, उत्सवादरम्यान तात्पुरत्या स्वरुपात देण्यात येणार्‍या विजेचे प्रती युनिट दर इतरांच्या तुलनेत कमी असतात. चार रुपयाच्या वर घरगुती वीज जोडणीचे दर आहेत. गणेश मंडळांना ३.२७ रुपये प्रति युनिट या दराने वीज दिली जाते. अनेक मंडळे घरगुती किंवा व्यावसायिक जोडणी असलेल्या ठिकाणांवरुन वीजपुरवठा घेतात. त्यामुळे घर किंवा प्रतिष्ठाच्या मालकांना आर्थिक भुर्दंड बसू शकतो. वीज वितरणकडून जोडणी घेतली तर कमी बिल येईल, असा दावा अधिकार्‍यांनी केला आहे. ऑनलाईन पद्धतीनेही वीजजोडणी घेता येते.

Web Title: 19 Mandal took over electricity connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.