१८ जण कोरोनामुक्त; पाच पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST2021-07-15T04:28:28+5:302021-07-15T04:28:28+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले ...

18 corona-free; Five positive | १८ जण कोरोनामुक्त; पाच पॉझिटिव्ह

१८ जण कोरोनामुक्त; पाच पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवारी नव्याने ५ रुग्ण आढळून आले तर १८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव तालु्क्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत ४१५८५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०८७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६२२ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

००००

८९ सक्रिय रुग्ण

बुधवारच्या अहवालानुसार नव्याने ५ रुग्ण आढळून आले तर १८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ८९ रुग्ण सक्रिय आहेत.

00000000

तीन तालुके निरंक

बुधवारच्या अहवालानुसार मानोरा, मालेगाव व मंगरूळपीर या तीन तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात एक रुग्ण आढळून आला. कारंजा व रिसोड शहरात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.

Web Title: 18 corona-free; Five positive