स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी १७० विद्यार्थ्यांनी दिली चाळणी परीक्षा
By Admin | Updated: April 23, 2017 19:50 IST2017-04-23T19:49:48+5:302017-04-23T19:50:16+5:30
वाशिम - स्पर्धा परीक्षा नि:शुल्क पूर्व प्रशिक्षणासाठी रविवारी स्थानिक मालतीबाई सरनाईक कन्या विद्यालयात चाळणी परीक्षा घेण्यात आली. १७० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी १७० विद्यार्थ्यांनी दिली चाळणी परीक्षा
वाशिम - स्पर्धा परीक्षा नि:शुल्क पूर्व प्रशिक्षणासाठी रविवारी स्थानिक मालतीबाई सरनाईक कन्या विद्यालयात चाळणी परीक्षा घेण्यात आली. १७० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एल.आय.सी. व तत्सम लिपिकवर्गीय पदांच्या स्पर्धा परीक्षेबाबत नि:शुल्क पूर्व प्रशिक्षण दिले जाते. सदर प्रशिक्षण तीन महिने कालावधीचे असून, संबंधित विद्यार्थ्याला मासिक तीन हजार रुपये विद्यावेतन आणि मोफत वाचन साहित्य दिले जाते. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता रविवारी चाळणी परीक्षा घेण्यात आली. एकूण १७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मागासवर्गीय समाजकल्याण संस्था जयपूरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गजपाल पी. इंगोले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या परीक्षेवर देखरेख ठेवली.