वाशिम जिल्हय़ात १६८0 एचआयव्हीबाधित रुग्ण

By Admin | Updated: November 30, 2014 23:57 IST2014-11-30T23:57:54+5:302014-11-30T23:57:54+5:30

जागतिक एडस दिन विशेष : गतवर्षीपेक्षा यावर्षी रुग्णांच्या संख्येत वाढ

1680 HIV-infected patients in Washim district | वाशिम जिल्हय़ात १६८0 एचआयव्हीबाधित रुग्ण

वाशिम जिल्हय़ात १६८0 एचआयव्हीबाधित रुग्ण

वाशिम : जिल्हय़ात ऑक्टोबर २0१४ पर्यंत १६८0 एचआयव्ही बाधीत रुग्णांची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दप्तरी आहे. या आजारावर नियमित उपचार अत्यावश्यक आहे. त्यासाठी आशा म्हणजेच अँक्टीव्ह आर्ट सव्र्हीसेस इन हेल्थ एरिया अँन्टी रेट्रोव्हायरल थेरपी केंद्र एआरटी ही सेवा शासनाने एचआयव्ही बाधीतांसाठी उपलब्ध करुन दिली आहे.
स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील एचआयव्ही एडस औषधोपचार केंद्र एआरटी येथे २६ नोव्हेंबर २00९ ते ३१ ऑक्टोबर २0१४ पर्यंत जिल्हय़ात एडसबाधीत रुग्ण आढळलेल्यांची संख्या १६८0 वर गेली आहे. गतवर्षी ही संख्या १५२0 च्या घरात होती. एचआयव्ही बाधितांमध्ये गरोदर माता, बालक, युवक, युवतींचाही समावेश आहे. मागील पाच वर्षाच्या काळात गरोदर मातांच्या मृत्यूची संख्या ५ तर १ ते १५ वष्रे वयोगटातील बालकांच्या मृत्यूची संख्या १३ आहे. अन्य २५४ अशा प्रकारे एकूण २७२ एचआयव्ही बाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने १६ सप्टेंबर १९९९ ला महाराष्ट्र एडस नियत्रण संस्थेची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून या संस्थेच्या माध्यमातून एडस विरोधात विविध प्रचार मोहिमा उपक्रम, अभियान व कार्यक्रम राबविले जात आहेत. एडस विषयी माहिती देवून प्रतिबंधक योजना करुन नविन कल्पना व जनजागृती करुन महाराष्ट्र राज्य एडसमुक्त करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही वर्षापूर्वी एचआयव्हीबाबत तपासणीसाठी रुग्ण पुढे येत नसत. मात्र जनजागृती झाल्याने व औषधोपचाराचे महत्व कळाल्यानंतर सध्या तपासणी व औषधोपचारासाठी रुग्णांचा प्रतिसाद वाढला असल्याचे दिसून येते.

Web Title: 1680 HIV-infected patients in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.