जिल्ह्यात नव्याने आढळले १६ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:27 IST2021-07-04T04:27:39+5:302021-07-04T04:27:39+5:30
जिल्ह्यात फेब्रुवारी ते ३ जुलै २०२१ या कालावधीत संसर्गाने बाधित होणाऱ्यांचा आकडा झपाट्याने वाढून ४१ हजार ४६६ वर पोहोचला ...

जिल्ह्यात नव्याने आढळले १६ कोरोना बाधित
जिल्ह्यात फेब्रुवारी ते ३ जुलै २०२१ या कालावधीत संसर्गाने बाधित होणाऱ्यांचा आकडा झपाट्याने वाढून ४१ हजार ४६६ वर पोहोचला आहे. असे असले तरी गेल्या महिनाभरात संसर्गाच्या संकटातून जिल्ह्याला बहुतांशी दिलासा देखील मिळत असल्याचे दिसून येत आहे. दैनंदिन बाधित आढळणाऱ्यांचा आकडा बहुतांशी घसरला असल्याने शासकीय व खासगी कोविड केअर सेंटरमधील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड रिकामे होऊ लागल्याचे दिसत आहे.
दरम्यान, शनिवारी नव्याने कोरोना पाॅझिटिव्ह आढळलेल्या १६ रुग्णांमध्ये वाशिम तालुक्यातील ३, मालेगाव शहरासह तालुक्यातील २, रिसोड तालुक्यात ६, मंगरूळपीर तालुक्यात ३, कारंजा तालुक्यात २ जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. मानोरा शहर व तालुक्यात शनिवारी पुन्हा एकही रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले.
................................
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४१,४६६
ॲक्टिव्ह – १६१
डिस्चार्ज – ४०,६८४
मृत्यू – ६२०