आणखी १६ पॉझिटिव्ह; ९ जणांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:26 IST2021-07-09T04:26:37+5:302021-07-09T04:26:37+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले ...

16 more positive; 9 beat Corona! | आणखी १६ पॉझिटिव्ह; ९ जणांची कोरोनावर मात!

आणखी १६ पॉझिटिव्ह; ९ जणांची कोरोनावर मात!

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी नव्याने १६ रुग्ण आढळून आले तर ९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रिसोड, मालेगाव व मानोरा शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत ४१५३१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०७७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६२२ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील एका बाधिताची नोंद झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

००००

१३१ सक्रिय रुग्ण

गुरुवारच्या अहवालानुसार नव्याने १६ रुग्ण आढळून आले तर ९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण १३१ रुग्ण सक्रिय आहेत.

000000000000

वाशिमचा ग्रामीण भाग निरंक

गुरुवारच्या अहवालानुसार वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागात एकही रुग्ण आढळून आला नाही. शहरातील शुक्रवारपेठेत एक रुग्ण आढळून आला. मालेगावच्या ग्रामीण भागात दोन रुग्ण आढळून आले. रिसोडच्या ग्रामीण भागात सहा रुग्ण, मंगरूळपीर शहरात व ग्रामीण भागात प्रत्येकी एक, मानोऱ्याच्या ग्रामीण भागात एक तर कारंजा शहरात दोन व ग्रामीण भागात एक रुग्ण आढळून आला.

Web Title: 16 more positive; 9 beat Corona!