वाशिम जिल्हा परिषदेच्या १५३ शाळा ‘नवोपक्रमशील’

By Admin | Updated: April 2, 2016 01:22 IST2016-04-02T01:22:12+5:302016-04-02T01:22:12+5:30

नवीन उपक्रमांचा समावेश: ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षण पद्धती.

153 schools of Washim Zilla Parishad are 'Innovative' | वाशिम जिल्हा परिषदेच्या १५३ शाळा ‘नवोपक्रमशील’

वाशिम जिल्हा परिषदेच्या १५३ शाळा ‘नवोपक्रमशील’

संतोष वानखडे/वाशिम
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी दिशादर्शक ठरणारा ह्यनवोपक्रमशील शाळाह्ण उपक्रम जिल्ह्यातील १५३ जिल्हा परिषद शाळांमध्ये साकारला असून, पुढील वर्षी यामध्ये वाढ करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने सोडला आहे.
खासगी शाळांच्या तुलनेत नगर परिषद, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावला असल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या शाळांना स्पर्धेत टिकविण्यासाठी शासन विविध प्रयोग करीत आहे. या प्रयोगाचा एक भाग म्हणून राज्य शासन ह्यप्रगत शैक्षणिक महाराष्ट्रह्ण अभियान राबवित आहे. या अभियानांतर्गत शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक ठरणारे उपक्रम साकारले जात आहेत. त्यापैकीच एक असलेला ह्यनवोपक्रमशील शाळाह्ण उपक्रम वाशिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पहिल्याच वर्षात जिल्ह्यातील १५३ शाळांमध्ये हा उपक्रम साकारला आहे. नानाविध प्रयोगाद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणार्‍या या नवोपक्रमशील शाळांमध्ये हसत-खेळत अध्ययन-अध्यापन पद्धती, विद्या परिषद पुणे येथून विशेष प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांद्वारे ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षण, शाळेला ह्यडिजिटलह्णची जोड मिळत आहे. शाळा बोलक्या होण्यासाठी भिंतींवर शिक्षणासंबंधी बोलकी छायाचित्रे, शाळांमध्ये आवश्यक त्या भौतिक सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न या ह्यनवोपक्रमशीलह्ण शाळांमधून होत आहे. रिसोड तालुक्यातील २८ शाळांनी ह्यनवोपक्रमशीलह्ण उपक्रम प्रत्यक्षात साकारला आहे. याप्रमाणेच मंगरुळपीर २५, वाशिम २५, मानोरा २५, मालेगाव २५ व कारंजा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २५ शाळा आहेत. केवळ पुस्तकी ज्ञानापुरते विद्यार्थ्यांना र्मयादित न ठेवता व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न या शाळांमधून होत असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. सन २0१६-१७ या शैक्षणिक सत्रात आणखी काही शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.

Web Title: 153 schools of Washim Zilla Parishad are 'Innovative'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.