१५ लाखांचा ऐवज लंपास

By Admin | Updated: September 12, 2014 01:51 IST2014-09-12T01:51:51+5:302014-09-12T01:51:51+5:30

ज्वेलर्सचे शटर तोडून दुकानामधील १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दागिने लंपास.

15 lakhs lump | १५ लाखांचा ऐवज लंपास

१५ लाखांचा ऐवज लंपास

वाशिम : येथील काटीवेस परिसरात असलेल्या गोविंद ज्वेलर्सचे शटर तोडून दुकानामधील १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व २0 हजार रूपये किमतीचे चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. वाशिम शहरातील सराफा व्यापारी दीपक नंदलाल वर्मा यांचे काटीवेस परिसरात ह्यगोविंद ज्वेलर्सह्ण नावाने प्रतिष्ठान आहे. वर्मा यांनी नेहमीप्रमाणे १0 सप्टेंबर रोजी रात्री आपले प्रतिष्ठान बंद करून घरी गेले. सकाळी ९ वाजता दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानाच्या शटरचे नट बोल्ट काढल्याचे निदर्शनास आल्याने चोरी झाल्याचे कळाले. ठाणेदार संग्राम सांगळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक उदय सोयस्कर यांच्यासह पोलिसांचे व श्‍वानपथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी दुकानामध्ये तपासणी केली असता दुकानामधून १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व २0 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास झाल्याचे निष्पन्न झाले. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पाचारण केलेल्या श्‍वानपथकाला चोरीचा उलगडा करण्यात यश मिळाले नाही. या घटनेची दीपक वर्मा यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: 15 lakhs lump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.