२१ गावांसाठी १.४२ कोटींचा निधी
By Admin | Updated: August 1, 2014 02:18 IST2014-08-01T02:15:24+5:302014-08-01T02:18:54+5:30
वाशिम जिल्ह्यातील २१ गावांसाठी शौचालयासंबंधी व नळजोडणीकरिता निधी मंजूर.

२१ गावांसाठी १.४२ कोटींचा निधी
वाशिम : राज्य शासनाने ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबांना खासगी नळजोडणी व वैयक्तिक शौचालय सुविधेसाठी १ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजना राबविण्याबाबत ग्रामपंचायतींना नळ जोडणी व वैयक्तिक शौचालयासाठी निधी मंजूर केला जातो. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील जवळपास २१ ठिकाणच्या शौचालयासंबंधी व नळजोडणीकरिता निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड यांनी दिली. यामध्ये रिसोड तालुक्यातील शौचालय सुविधेसाठी केनवड येथे १0 लाख ९ हजार ८00 रुपये,वाशिम तालुक्यातील वाळकी जहाँगीर येथे ५ लाख ९४ हजार ६६0, धानोरा बु. ५ लाख ६१ हजार, खरोळा येथे ८ लाख ६३ हजार ९४0, केकतउमरा येथे ५ लाख २७ हजार ३४0, काटा येथे १९ लाख २९ हजार ८४0 रुपये, कोकलगाव येथे ५ लाख ६१ हजार रुपये, जुमडा येथे २ लाख ८0 हजार ५00 रुपये, मालेगाव तालुक्यातील अमानी येथे १४ लाख ३६ हजार १६0 रुपये, कारंजा तालुक्यातील पोहा येथे ८ लाख ६३ हजार ९४0 रुपये, लोणी अरब येथे ५ लाख ४९ हजार ७८0 रुपये, शेलूवाडा येथे ३ लाख १४ हजार १६0 रुपये, कारली येथे ६ लाख ५0 हजार ७६0, पिंप्री मोखड येथे ६ लाख ३९ हजार ५४0 रुपये, मानोरा तालुक्यातील अभयखेडा येथे ९ लाख ५३ हजार ७00 रुपये, हळदा येथे ७ लाख ६ हजार ८६0 रुपये, मंगरुळपीर तालुक्यातील चकवा येथे ४ लाख ६0 हजार २0 रुपये, तर नळजोडणीकरिता कवठळ येथे ७ लाख ७१ हजार १२0 रुपये, पारवा येथे २ लाख ३२ हजार ५६0 रुपये, सावरगाव कान्होबा येथे १ लाख ५५ हजार ४0 रुपये तर जोगलदरी येथे १ लाख ३८ हजार ७२0 रुपये निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेला निधी तत्काळ खर्ची करण्याबाबत संबंधीतांना आदेशीतही करण्यात आले आहे.