कारंजा तालुक्यात पावसाची १४ टक्के तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:27 IST2021-07-21T04:27:06+5:302021-07-21T04:27:06+5:30

जिल्ह्यात सर्व मिळून जून ते सप्टेंबर अखेर ७८९ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. स्वतंत्र सरासरीचा विचार करता कारंजा तालुक्यात याच ...

14% deficit in rainfall in Karanja taluka | कारंजा तालुक्यात पावसाची १४ टक्के तूट

कारंजा तालुक्यात पावसाची १४ टक्के तूट

जिल्ह्यात सर्व मिळून जून ते सप्टेंबर अखेर ७८९ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. स्वतंत्र सरासरीचा विचार करता कारंजा तालुक्यात याच कालावधीत ७२२.५ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. त्यात १ जून ते २० जुलैदरम्यान ३१८.१ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना यंदा याच कालावधी २७३.९ मि.मी. पावसाची नोंद होऊ शकली आहे. अर्थात आजवरच्या सरासरीपेक्षा १४ टक्के कमी पाऊस कारंजा पडला आहे. इतर तालुक्यात मात्र आजवरच्या सरासरीपेक्षा अधिकच पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, कारंजात १४ टक्के पावसाची तूट असली तरी पिकांची स्थिती मात्र सध्या समाधानकारक असून, तालुक्यातील काही महसूल मंडळात पावसाने सरासरी ओलांडली आहे. तथापि, तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजवर ३७ टक्के पावसाची नोंद झाली असून, पुढील सव्वा दोन महिन्यांत दमदार पाऊस न पडल्यास ही तूट भरून निघू शकणार नाही, तसेच काही गावांत पाणीटंचाईची समस्याही उद्भवण्याची भीती आहे.

-------------------

गतवर्षीपेक्षा ३२ टक्के कमी पाऊस

कारंजा तालुक्यात वार्षिक सरासरी ७२२.५ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो, तर १ जून ते २० जुलैदरम्यान ३१८.१ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना यंदा याच कालावधी २७३.९ मि.मी. पावसाची नोंद होऊ शकली आहे. गतवर्षी याच कालावधीत कारंजा तालुक्यात ३७५.९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. अर्थात उपरोक्त कालावधीतील अपेक्षित सरासरी पेक्षा १८ टक्के अधिक पाऊस पडला होता. यंदा मात्र याच कालावधीत २७३.९ मि.मी. पावसाची नोंद होऊ शकली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण ३२ टक्के कमी आहे.

-------------------

महामार्गांच्या शेततळ्यांचा आधार

कारंजा तालुक्यात यंदा अपेक्षित सरासरीच्या तुलनेत सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यात समृद्धी महामार्गासह राष्ट्रीय महामार्गाच्या निमित्ताने गौणखनिज पूर्ततेसाठी साठवण तळ्यांची कामे झाली आहेत. यातील बहुतांश साठवण तळे काठोकाठ भरले असून, या साठवण तळ्यांमुळे भूजल पातळी टिकून राहण्यास मदत होणार असल्याने तालुक्यात हिवाळा अखेरपर्यंत तरी पावसाचे प्रमाण कमी असतानाही पाणीटंचाईची समस्या फारसी तीव्र होण्याची शक्यता दिसत नाही.

--------------

कारंजा तालुक्यातील पावसाची स्थिती

-जून ते सप्टेंबर अपेक्षित पाऊस - ७२२.६ मि.मी.

-१ जून ते २० जुलै अपेक्षित पाऊस -३१८.१ मि.मी.

-१ जून ते २० जुलै प्रत्यक्ष पाऊस -२७३.९ मि.मी.

Web Title: 14% deficit in rainfall in Karanja taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.