शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१३४ प्रकल्पांमध्ये उरला जेमतेम ७ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 14:00 IST

वाशिम : जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू अशा १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू अशा १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ९७ धरणे कोरडी पडली असून, सहाही तालुके पाण्याच्या बाबतीत ‘डेंजर झोन’मध्ये सापडली आहेत. पाण्यासाठी हाहा:कार माजलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई निवारण उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, त्यास आधीच उशीर होण्यासोबतच दिरंगाई होत असल्याने समस्या सुटण्याऐवजी अधिकच गहण होत चालली आहे.दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठला. यामुळे वाढत्या बाष्पीभवनाचा प्रचंड परिणाम होवून जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील पाणीपातळी झपाट्याने कमी झाली आहे. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार सद्य:स्थितीत मालेगाव तालुक्यातील सोनल या मध्यम प्रकल्पाने तळ गाठला असून वाशिम तालुक्यातील एकबूर्जी प्रकल्पात १३; तर कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पात १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. लघू प्रकल्पांमधील उपलब्ध जलसाठ्याची सद्य:स्थिती मात्र फारच चिंताजनक असून वाशिम तालुक्यातील ३५ लघूप्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ३ टक्के पाणी उरले आहे. बोराळा, शेलगाव, फाळेगाव आणि पंचाळा या चार प्रकल्पांचा अपवाद वगळता इतर ३१ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली आहे.मालेगाव तालुक्यातील २३ प्रकल्पांमध्ये सद्या ३.५० टक्के पाणी शिल्लक असून ५ प्रकल्प वगळता इतर १८ प्रकल्पांची पातळी शून्य टक्के आहे. रिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांपैकी ३ प्रकल्पांमध्ये सरासरी ३.२५ टक्के पाणी शिल्लक असून १५ प्रकल्पांची पातळी शून्यावर आहे. मंगरूळपीर तालुक्यात १५ प्रकल्प असून २ प्रकल्पांमध्येच ३ टक्के पाणी शिल्लक असून इतर सर्व प्रकल्प कोरडे पडले आहेत. मानोरा तालुक्यातील २४ प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पांमध्ये १० टक्के पाणी शिल्लक आहे; तर उर्वरित १४ प्रकल्प पूर्णत: कोरडे झाले आहेत. जिल्ह्यातील या पाच तालुक्यांच्या तुलनेत कारंजा तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती मात्र थोडी चांगली असून १६ प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पांमध्ये सरासरी १७ टक्के पाणीसाठा आजमितीस शिल्लक असून इतर ८ प्रकल्पांची पातळी शून्यावर गेलेली आहे. एकूणच पाणी उपलब्धतेच्या बाबतीत सर्वच तालुके थोड्याफार फरकाने ‘डेंजर झोन’मध्ये सापडले असून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसह अन्य पाणीपुरवठा योजनांवर प्रचंड परिणाम झाला आहे. आगामी पावसाळ्यापर्यंत पाणी पुरावे, या उद्देशाने प्रशासनाकडून पाणीपुरवठ्यावर कात्री लावण्यात आल्याने शहरांमध्ये १० दिवसानंतरच नळाला पाणी सोडले जात आहे. ग्रामीण भागात आजपर्यंत केवळ १६ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू होवू शकला. त्यातही सातत्य नसल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईDamधरण