शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

वाशिम जिल्ह्यातील १,३८१ विद्यार्थीनींना मिळणार सायकल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 15:18 IST

वाशिम : इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या तथा शाळेपासून ५ किलोमिटरपेक्षा अधिक अंतरावर वास्तव्य करणाºया विद्यार्थीनींना मानव विकास मिशनमधून सायकलसाठी निधी दिला जातो.

ठळक मुद्देआठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या तथा शाळेपासून पाच किलोमिटरपेक्षा अधिक अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थीनींना सायकलचा लाभ दिला जातो. निधी जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर आणि तेथून थेट विद्यार्थीनींच्या बँक खात्यात जमा केला जातो.४१ लाख ४३ हजार रुपये शिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात आला आहे. 

वाशिम : इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या तथा शाळेपासून ५ किलोमिटरपेक्षा अधिक अंतरावर वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थीनींना मानव विकास मिशनमधून सायकलसाठी निधी दिला जातो. त्यानुसार, २०१७-१८ मध्ये वाशिम, मालेगाव, रिसोड आणि मानोरा या चार तालुक्यांमधील १३८१ विद्यार्थीनींना सायकलसाठी प्रत्येकी ३ हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्याची एकत्रित रक्कम ४१ लाख ४३ हजार रुपये माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यात मार्चअखेर वर्ग करण्यात आल्याची माहिती मानव विकास मिशनच्या रेखा गुरव यांनी सोमवारी दिली.जिल्ह्यात मानव विकास मिशनअंतर्गत चार तालुक्यांचा समावेश असून शासनाच्या निर्देशानुसार संबंधित तालुक्यांमध्ये विविध स्वरूपातील उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी मागासलेल्या तालुक्यांमधील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या तथा शाळेपासून पाच किलोमिटरपेक्षा अधिक अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थीनींना सायकलचा लाभ दिला जातो. यासंदर्भातील निधी जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर आणि तेथून थेट विद्यार्थीनींच्या बँक खात्यात जमा केला जातो. त्यासाठी ४१ लाख ४३ हजार रुपये शिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत वाशिम तालुक्यातील ४०७ विद्यार्थीनींना १२ लाख २१ हजार, मालेगाव तालुक्यातील ८७ विद्यार्थीनींना २ लाख ६१ हजार, रिसोड तालुक्यातील २२६ विद्यार्थीनींना ६ लाख ७८ हजार आणि मानोरा तालुक्यातील ६६१ विद्यार्थीनींना १९ लाख ८३ हजार रुपयांची तरतूद असल्याची माहिती गुरव यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय