मेडशी येथे व-हाडाच्या वाहनाला अपघात, १३ जण जखमी
By Admin | Updated: May 31, 2016 02:00 IST2016-05-31T02:00:38+5:302016-05-31T02:00:38+5:30
अकोला-नांदेड महामार्गावर गाडीचा समोरचा टायर फुटल्याने अपघात

मेडशी येथे व-हाडाच्या वाहनाला अपघात, १३ जण जखमी
मेडशी (जि. वाशिम ) : अकोला-नांदेड महामार्गावर मेडशीजवळ लग्नासाठी जाणार्या वर्हाडाच्या गाडीचा समोरचा टायर फुटल्याने सोमवारी दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये १३ जण जखमी झाले. पातूर तालुक्यातील भंडारज येथील सुरवाडे यांच्या कुटुंबातील मुलाच्या लग्नाचे वर्हाड मालेगाव तालुक्यातील अमानी येथे खंडारे यांच्या मुलीच्या लग्नासाठी जात होते. दरम्यान, मेडशीजवळ एमएच ३0 - ७९८२ क्रमांकाच्या क्रूझरचा टायर फुटल्याने क्रूझर रस्त्याच्या बाजूच्या खड्डय़ात जाऊन पडली. यामध्ये १३ जण जखमी झाले. जखमींमध्ये सोनू अशोक इंगळे, मुरलीधर श्रीराम इंगळे, बाळू विठ्ठल वाकोडे, विनोद बळीराम घोडेराव, गुलाब शेषराव इंगळे, हर्षल गोवर्धन इंगळे, किशोर मुरलीधर इंगळे, विश्वास सुखदेव इंगळे, हरिष गोवर्धन इंगळे, निशांत कैलास इंगळे, नितेश बाबूराव सुरवाडे, रामकृष्ण बबन सुरवाडे, बाळू वाकोडे यांचा समावेश आहे. जखमींना तत्काळ मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना अकोला ये थील सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.