साडीचा गळफास लागून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू
By Admin | Updated: June 12, 2016 02:51 IST2016-06-12T02:51:47+5:302016-06-12T02:51:47+5:30
घराच्या आवारात खेळताना घडली घटना.

साडीचा गळफास लागून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू
उंबर्डा बाजार (जि. वाशिम): घराच्या आवारात खेळताना साडीचा गळफास लागल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना कारंजा तालुक्यातील दुघोरा येथे ११ जून रोजी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दुघोरा येथील मनभा मार्गावरील झोपडपट्टीत आजीच्या घरी राहणारा विजय दिलीप श्रृंगारे हा १२ वर्षीय मुलगा आजी शेतावर कामासाठी गेली असताना घरी खेळत होता. अशातच घरी असलेल्या जवळपास १0 फूट उंचीच्या निंबाच्या झाडावर खेळताना साडीचा गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मृतक विजयचे वडील लहानपणीच वारले असून आईसुद्धा गेल्या दोन वर्षांंपासून दम्याच्या आजारामुळे यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. विजयचा भाऊ आदिलाबाद येथे कामासाठी गेला असून, आजी शेतावर काम करून विजयचे पालनपोषण करीत होती. विजय यावर्षी नुकताच चौथीची परीक्षा उत्तीर्ण होऊन पाचवीत गेला होता. मनमिळावू स्वभावामुळे तो सर्वांंचा परिचित होता. त्याच्या मृत्यूमुळे गावकर्यांत हळहळ व्यक्त होत आहे. मृतक विजयच्या घरी म्हातार्या आजीशिवाय कुणीच कर्ता नाही.