१२ लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:59 IST2017-07-18T00:59:44+5:302017-07-18T00:59:44+5:30
शिरपूर पोलिसांची कारवाई; वाहनही जप्त

१२ लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला!
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूरजैन : मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी सापळा रचून १२ लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला. ही कारवाई १७ जुलै रोजी करण्यात आली.
वाशिमवरून रिसोड येथे एम.एच.२७ एक्स १५५५ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये गुटखा जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे, गिरीश तोगडवाल, माणिक खानझोडे संतोष पाईकराव, रतन बावस्कर, रामेश्वर जोगदंड, प्रशांत राजगुरु, मनोज काकडे, गंगाधर मडाणी, जि.प.चालक रमेश मोरे यांनी संयुक्तरीत्या कारवाई करत आरोपी ट्रकचालक शे.माजीद (रा.पातूर) यास ताब्यात घेऊन १२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला.