अनसिंग (जि. वाशिम) : येथील शृंगऋषी कॉलनीमध्ये राहणार्या दिलीप हिरासा अहाळे यांच्या घरातील मंडप साहित्याला मंगळवारी मध्यरात्री दरम्यान लागलेल्या आगीमध्ये १२ लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिलीप हिरासा अहाळे यांनी अनसिंग पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत दिली. अनसिंग येथील शृंगऋषी कॉलनीमध्ये दिलीप आहाळे यांचे राहते घर असून त्याचा गेल्या अनेक वर्षापासून मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. मंगळवारी १७ फेब्रुवारीला दिलीप अहाळे बाहेरगावी गेले असता मध्यरात्री दरम्यान त्यांच्या घराला आग लागली. घरामध्ये बंद खोलीत तथा आवारात मंडप डेकोरेशनचे साहित्य होते. त्यामुळे अचानक लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केले. आग लागल्याची चुनुक लागताच शेतकर्यांनी तथा कॉलनीतील लोकांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली. वाशिमवरुन अग्नीशामन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सुदैवाने ही आग आटोक्यात आल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. या आगीमध्ये दिलीप अहाळे यांच्या तीन दुचाकी गाडया, सायकल रिक्षा, जनरेटर्स, हॅलोजन लाईट, बांबू, कपडे, खुच्र्या, टयुब लाईट, इतर अनेक महागडे साहित्य जळून खाक झाले.
मंडप साहित्याला आग लागून १२ लाखाचे नुकसान
By admin | Updated: February 19, 2015 01:53 IST