वाशिम शहरातील ११९ रुग्णालयांकडे अग्निशमनची 'एनओसी'च नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 11:56 AM2021-01-12T11:56:09+5:302021-01-12T11:59:33+5:30

Washim Hospital शहरातील काही माेजक्या ४ ते ५ हाॅस्पिटलकडेच अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आहे.

119 hospitals in Washim city do not have fire fighting NOC | वाशिम शहरातील ११९ रुग्णालयांकडे अग्निशमनची 'एनओसी'च नाही

वाशिम शहरातील ११९ रुग्णालयांकडे अग्निशमनची 'एनओसी'च नाही

Next
ठळक मुद्दे अग्निशमन विभागाकडून प्रत्येक रुग्णालयाला दोन एनओसी घ्याव्या लागतात.केवळ पाच रुग्णालयांनी अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणापत्र घेतलेले आहे.  


लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : भंडारा येथील दुर्दैवी घटनेनंतर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचा ‘फायर ऑडिट’चा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णालयाचे काम सुरू करण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यानंतर अशा अग्निशमन विभागाकडून प्रत्येक रुग्णालयाला दोन एनओसी घ्याव्या लागतात.  वाशिम शहरातील किती रुग्णालयाने हे नाहरकत प्रमाणपत्र घेतले याची माहिती घेतली असता ११९ रुग्णांलयांकडे ते नसल्याची माहिती पुढे आली आहे.
वाशिम शहरामध्ये एकूण १२४ नाेंदणीकृत रुग्णालये आहेत. यापैकी केवळ ५७ रुग्णालयांची फायर ब्रिगेड नाेंदणी करण्यात आली आहे. परंतु यातील केवळ पाच रुग्णालयांनी अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणापत्र घेतलेले आहे.  
वाशिम शहरातील असलेल्या बहुतांश रुग्णालयांतील फायर ऑडिट करण्यात आले असले तरी अग्निशनम विभागाचे प्रमाणपत्र मात्र माेजक्याच हाॅस्पिटलकडे असल्याचे अग्निशमन विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. फायर ऑडिट केल्यानंतर अग्निमशन विभागाकडे नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करून ते घ्यावे लागते. 
मात्र, अनेकांनी हे प्रमाणपत्र घेतले नसल्याचे अग्निशमन विभागातील नाेंदीवरून दिसून येते. शहरातील काही नामांकित व माेठ्या अशा केवळ ५ हाॅस्पिटलकडेच नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध असल्याची माहिती आहे.

शहरातील काही माेजक्या ४ ते ५ हाॅस्पिटलकडेच अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आहे. १० जानेवारी राेजी शहरातील ७३ हाॅस्पिटलला भेट देऊन सर्वांना याबाबत नाेटीस बजावण्यात आली आहे. यामधील अनेक हाॅस्पिटलचे फायर ऑडिट झाल्याचे दिसून आले. 
- अनुजकुमार बासम, 
अग्निशमन विभागप्रमुख, वाशिम

Web Title: 119 hospitals in Washim city do not have fire fighting NOC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.