रिसोड तालुक्यात आतापर्यंत ११०९ संदिग्धांचे घेतले स्वॅब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 04:35 PM2020-08-04T16:35:42+5:302020-08-04T16:37:16+5:30

रिसोड तालुक्यात आतापर्यंत ११०९ संदिग्धांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी घेतले तर ४०२ जणांची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्यात आली.

1109 suspects swabbed in Risod taluka so far! | रिसोड तालुक्यात आतापर्यंत ११०९ संदिग्धांचे घेतले स्वॅब !

रिसोड तालुक्यात आतापर्यंत ११०९ संदिग्धांचे घेतले स्वॅब !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर रिसोड तालुक्यात आतापर्यंत ११०९ संदिग्धांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी घेतले तर ४०२ जणांची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्यात आली.  यापैकी १३० जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून, सध्या ३९ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. दरम्यान आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे.
११ जूनपर्यंत रिसोड तालुका हा कोरोनामुक्त होता. शहरात पहिला रुग्ण १२ जून रोजी आढळून आला होता. त्यानंतर शहर व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांमुळे शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला. आतापर्यंत तालुक्यात ११०९ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यापैकी ११८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ४०२ जणांची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्यात आली असून २२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. १३० रुग्णांपैकी सध्या ३९ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून, उर्वरीत रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, ४ आॅगस्ट रोजी १६ जणांच्या थ्रोट स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला तसेच १५ जणांची अ‍ॅन्टिजन टेस्टही निगेटिव्ह आल्याने तालुकावासियांना थोडा दिलासा मिळाला. 
खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण आणि आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तालुक्यात सर्वाधिक रुग्ण मांगवाडी या गावात आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान मांगवाडी येथील रुग्ण कोरोनावर मात करीत असल्याने गावकºयांना दिलासाही मिळत आहे. प्रतिबंधित क्षेत्र आणि रिसोड शहरातील नागरिकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
  
शहरासह ग्रामीण भागात गर्दी कायम... !
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वप्रथम १४ जून ते १७ जून असा चार दिवस रिसोड शहरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. व्यापाºयांनी पुकारलेल्या या जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग लाभल्याने चार दिवस शहरात सामसूम होता. त्यानंतर प्रशासनातर्फे १५ जुलै ते २१ जुलै या दरम्यान संपूर्ण लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आला. १ आॅगस्टपासून सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा मिळाल्याने शहरासह ग्रामीण भागात नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून येते.

Web Title: 1109 suspects swabbed in Risod taluka so far!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.