११ वर्षीय शाळकरी मुलगा बेपत्ता

By Admin | Updated: April 8, 2015 01:56 IST2015-04-08T01:56:18+5:302015-04-08T01:56:18+5:30

रिसोड येथील घटना.

11-year-old schoolgirl missing boy | ११ वर्षीय शाळकरी मुलगा बेपत्ता

११ वर्षीय शाळकरी मुलगा बेपत्ता

रिसोड (जि. वाशिम) : स्थानिक आनंदी चौकमधील ११ वर्षीय शाळकरी मुलगा रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची घटना ही ६ एप्रिल रोजी दुपारी ५ वाजताच्या दरम्यान घडली आहे. येथील भारत माध्यमिक शाळेमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी सुयोग पवार हा शिकवणी वर्गाला जातो म्हणून घरून निघून गेला आणि परत आला नाही. १२ तास उलटूनही तो घरी आला नसल्यामुळे रिसोड पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणी कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदर मुलगा नागपूर येथे बेशुद्धावस्थेत आढळला असल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: 11-year-old schoolgirl missing boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.