शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

११ गावांमध्ये दारूबंदी

By admin | Updated: October 13, 2014 02:02 IST

वाशिम पोलिसांचा अँक्शन प्लॅन; महिलांचे सहकार्य.

देपुळ (वाशिम): गावातील दारूबंदीसाठी आसेगाव पोलिसांनी अँक्शन प्लॅन बनवून ११ गावात महिला मंडळाच्या सहकार्यातून दारूबंदीचा यशस्वी प्रयोग केला आहे. निवडणुकीच्या काळातही या गावांमध्ये दारूचा थेंबही येत नसल्याने हा प्रयोग यशस्वी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.आसेगाव पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्‍या वारा (जहाँगीर), वसंतवाडी, पिंपळगाव, शेंदुरजना (आढाव), मेनद्ररा, लही, शिवणी (द.), गोस्ता, आसेगाव, वटफळ, इचोरी इत्यादी गावामध्ये समाज प्रबोधन तसेच दारु बंदीसाठी महिला मंडळाची स्थापना केली. आसेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनिल अंबुलकर यांनी केलेल्या प्रयत्नामुळे ११ गावामध्ये दारुबंदी झाली आहे. ठाणेदार अंबुलकर यांनी गणेश व दुर्गा उत्सवाचे औचित्य साधून शांतता कमेटीच्या सभेच दारूबंदीचा अँक्शन प्लॅन मांडला होता. दारुबंदीसाठी गावामध्ये, ग्रामपंचायतचे पदाधिकारी विविध उत्सव मंडळ, क्रिडा मंडळ, भजनी मंडळ, महिला मंडळ, तंटामुक्त गाव समिती ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही केले होते. आता या उपक्रमाला यश येत असल्याचे दिसून येत आहे. पोलिस आणि महिला मंडळाच्या सहकार्यातून ५५ पैकी ११ गावात दारुबंदी होवून दारु हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. उर्वरीत ४४ गावात पूर्णपणे दारु बंद करण्याचा संकल्प आसेगाव पोलिसांनी केला आहे.