११ लाखाचा गुटखा पकडला!
By Admin | Updated: June 28, 2017 18:27 IST2017-06-28T18:27:13+5:302017-06-28T18:27:13+5:30
वाशिम : जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गठीत केलेल्या विशेष पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून तालुक्यातील बोराळा फाटा येथे नाकाबंदी करून हैद्राबादवरून इंदौरकडे गुटखा घेवून जाणारा ट्रक ताब्यात घेतला.

११ लाखाचा गुटखा पकडला!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गठीत केलेल्या विशेष पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून तालुक्यातील बोराळा फाटा येथे नाकाबंदी करून हैद्राबादवरून इंदौरकडे गुटखा घेवून जाणारा ट्रक ताब्यात घेतला. त्यातील ११ लाख ७० हजार रुपयांचा माल जप्त करण्याची कारवाई बुधवार, २८ जून रोजी करण्यात आली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एमपी ०९ एचएफ ८४९५ या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने हैद्राबाद येथून इंदौरकडे चोरट्या मार्गाने गुटखा जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करून ११ लाख ७० हजाराचा गुटखा आणि २० लाख रुपये किमतीचे वाहन ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपी मनोज मांगू चव्हाण (रा.गवलू,ता.महू,जि.इंदौर) आणि केदारसिंग बापूलाल वर्मा (रा.रुपारेल,ता.नरसिंहगड,जि.राजगड) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.