शहरं
Join us  
Trending Stories
1
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
2
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
3
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
4
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
5
बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी; तुळजापूर कनेक्शन?
6
Video - भलताच छंद! 'ती' डास मारते, जपून ठेवते अन् त्याला खास नाव देते; ठेवलाय अजब रेकॉर्ड
7
खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग
8
मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या!
9
First ATM: केवळ ११,२०० लोकसंख्येचा असा देश, जिथे एकही ATM नव्हतं; आता सुरु झालं पहिलं एटीएम
10
तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई?
11
भीषण, भयंकर! ...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; १७ सेकंदाचा अंगावर काटा आणणारा Video
12
शाहरुखच्या 'सर्कस' मालिकेतील मारियासाठी रेणुका शहाणेंना नव्हती पहिली पसंती, पण अशी मिळाली ही भूमिका
13
उपचार घेत असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार, ICU लॅबमधील टेक्निशियनला अटक; CCTV मुळे आरोपी जाळ्यात
14
धोनी, अशनीर ग्रोव्हर ते दीपिका पादुकोण... BluSmart मध्ये दिग्गजांचे पैसे बुडाले, आता कंपनी बुडण्याच्या मार्गावर
15
भारतीय अँजिओप्लास्टीचे जनक डॉ. मॅथ्यू सॅम्युएल यांचे निधन, नेत्यांपासून ते उद्योगपतींवर केले होते उपचार
16
Mumbai: चेंबूर परिसरात बीएमसीचा कचरावाहू ट्रक उलटला; एकाचा मृत्यू, दोन जखमी
17
बेकायदा बांधकामांमुळे नियोजित विकासाला धोका, उच्च न्यायालयाने 'बीएमसी'ला फटकारले
18
चीन सोबत डील, पॉलिसीमध्ये बदल; ट्रम्प यांनी हार मानली का? अचानक का बदलले त्यांचे सूर
19
Video: धक्कादायक! जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
20
मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून...; मंत्र्यांचा दावा खोडत धनंजय मुंडेंनी प्रकृतीबाबत केला खुलासा

वाशिम जिल्हा नियोजन समितीच्या सभेत १०२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 17:40 IST

वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०१९-२० करीता १०२ कोटी ८६  लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या १६ जानेवारीच्या सभेने मंजूरी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०१९-२० करीता १०२ कोटी ८६  लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या १६ जानेवारीच्या सभेने मंजूरी दिली आहे. दरम्यान, २०१८-१९ या वर्षातील प्राप्त निधी विहित कालावधीत विहित कामांवर खर्च होईल, याची खबरदारी घ्यावी. निधी अखर्चित ठेवणाºया तसेच निधी समर्पित करणाºया शासकीय यंत्रणांची गंभीर दखल घेवून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे इशारा पालकमंत्री संजय राठोड यांनी दिला. नियोजन भवन सभागृहात बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती विश्वनाथ सानप, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, सदस्य डॉ. किशोर मोघे, विकास गवळी, गजानन अमदाबादकर, अनिल कांबळे, सुखदेव मोरे, चिंतामण खुळे, रेखा मापारी, नथुजी कापसे, राजेश जाधव, देवेंद्र ताथोड, मनिषा टाले, गौरी पवार, अन्नपूर्णा मस्के, शबानाबी म. अफसर, ज्योती लवटे, करुणा कल्ले यांच्यासह समितीचे सदस्य व अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी वायाळ यांनी सादरीकरण केले.पालकमंत्री राठोड म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून होणारे काम हे विहित कालावधीत पूर्ण होवून त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून होणाºया कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये. तसेच यंत्रणांनी संबंधित कामाविषयीची पूर्वतयारी व आपल्या निधी खर्चाची  क्षमता लक्षात घेवूनच निधीची मागणी करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्मिती, रस्ते विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी प्रस्ताव सादर करावेत. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत असणे आवश्यक आहे. इमारत नसलेल्या अंगणवाड्यांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.आमदार पाटणी म्हणाले, जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींना तांडा विकास योजनेंतर्गत निधी देवून सुद्धा त्यांच्याकडून दोन-दोन वर्षे निधी खर्च केला जात नाही. निधी असूनही ग्रामपंचायतींच्या दिरंगाईमुळे नागरिकांना सुविधांचा लाभ मिळत नाहीत. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा अखर्चित निधी परत घेवून तो इतर ग्रामपंचायतींना द्यावा, अशा सूचना केल्या.आमदार झनक म्हणाले, जिल्ह्यात काही खाजगी कंपन्यांकडून केबल टाकण्यासाठी करण्यात येत असलेल्या खोदकामामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे. त्यामुळे या कंपन्यांकडून नुकसानभरपाई वसूल केली जावी. यावर बोलताना पालकमंत्री राठोड यांनी संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करून कंपनीला खोदकामासाठी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र स्थगित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित विभागांनी याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

 असा आहे प्रारूप आराखडाजिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०१९-२० करिता मंजूर करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत १०२ कोटी ८६ लाख रुपये, अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत ६२ कोटी ९४ लाख रुपये व आदिवासी उपयोजना अंतर्गत १२ कोटी ६२ लाख  ३५ हजार रुपयांच्या कमाल आर्थिक मर्यादेत प्रारूप आराखड्यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय