कारच्या धडकेत दहा वर्षीय मुलगी दगावली!
By Admin | Updated: April 16, 2016 01:36 IST2016-04-16T01:36:18+5:302016-04-16T01:36:18+5:30
मानोरा तालुक्यातील घटना.

कारच्या धडकेत दहा वर्षीय मुलगी दगावली!
मानोरा (जि. वाशिम): मानोरा तालुक्यातील उमरी खुर्द-फुलउमरी रस्त्यावर भरधाव कारने एका यात्रेकरु १0 वर्षीय मुलीला धडक दिली. यामध्ये मुलगी जागेवरच दगावली असून, ही घटना १५ एप्रिल रोजी घडली.
कोमल लक्ष्मण राठोड असे मृत मुलीचे नाव असून, राठोड कुटुंब माहूर तालुक्यातील येवलेश्वर येथील रहीवाशी असल्याची माहिती आहे. कारचा चालक फरार आहे. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता दिग्रस येथे हलविण्यात आला. मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या उमरी खुर्द -फुलउमरी रोडलगतच्या शेतात यात्रेकरिता लक्ष्मण राठोड यांचे कुटुंब १४ एप्रिल रोजीच आले होते. आई -वडिलासह कोमलदेखील यात्रेकरिता राम नवमी उत्सवाला आली होती. १५ एप्रिल रोजी रस्त्यावर उभी असताना, उमरी खुर्द गावाजवळ एमएच ३७ बी ४७११ क्रमांकाच्या कारने कोमलला धडक दिली. यामध्ये कोमल जागीच ठार झाली. कारचा चालक फरार असून, गाडी शेतात पडलेली आहे. चिमुकलीचा जीव गेल्याने यात्रा महोत्सवाकरिता आलेल्या राठोड कुटुंबावर काळाचा आघात झाला.