नगर पंचायत निवडणुकीसाठी १0 उमेदवारी अर्ज
By Admin | Updated: December 16, 2015 01:51 IST2015-12-16T01:51:29+5:302015-12-16T01:51:29+5:30
मानोरा नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी १0 उमेदवारी अर्ज दाखल झाले.

नगर पंचायत निवडणुकीसाठी १0 उमेदवारी अर्ज
मानोरा (जि. वाशिम): मानोरा नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी १६ डिसेंबर रोजी १0 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यापूर्वी ४ अर्ज दाखल झाले होते. एकूण १४ अर्ज दाखल झाले. १५ डिसेंबर रोजी प्रभाग १३ मध्ये सखाराम तुकाराम डेरे यांनी तर प्रभाग १७ मध्ये अहमद बेग चाँद बेग यांनी अर्ज दाखले केले. १६ डिसेंबर रोजी प्रभाग १ मध्ये शेख फारुक शेख खजमीर, रामहरी वाळले , प्रभाग ७ मध्ये कविता अरुण राठोड, प्रभाग ८ मध्ये सुनील तुकाराम मात्रे, प्रभाग १0 मधये राजू यादव मोहाळे, प्रभाग १३ मध्ये ज्ञानेश्वर विठ्ठल गोतरकर, विजया तुळशिराम खडसे, प्रभाग १४ मध्ये रमा उत्तम शिरसाट, प्रभाग १७ मध्ये अरुण लक्ष्मण कंठाळे यांनी अर्ज दाखल केले. मालेगाव येथे चार अर्ज दाखल करण्यात आले. आतापर्यंंत राजू पंडितराव मुखमाले, मदन उकंडा राऊत, आशीष मदन बळी, पंकज मूलचंद ओझा, सुरेखा अनिल बळीराम, शीतल दिलीप गट्टाणी, मंदाबाई अशोक इंगळे, सतीश नारायण हरणे, सुषमा अमोल सोनोने, मोहन पुरुषोत्तम बळी, रामदास किसन बळी, सुनील ङ्म्रीराम शर्मा, सत्यनारायण हरसुख शर्मा आदींनी नामांकन अर्ज दाखल केले.