३६७ बेवारस वाहनांचे १० लाख शासनाकडे जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:25+5:302021-02-05T09:27:25+5:30

पाेलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील पाेलीस स्टेशनला भेटी दिल्या असता, जवळपास सर्वच पाेलीस स्टेशन आवारात बेवारस स्थितीत माेठ्या प्रमाणात वाहने ...

10 lakh of 367 unattended vehicles deposited with the government | ३६७ बेवारस वाहनांचे १० लाख शासनाकडे जमा

३६७ बेवारस वाहनांचे १० लाख शासनाकडे जमा

पाेलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील पाेलीस स्टेशनला भेटी दिल्या असता, जवळपास सर्वच पाेलीस स्टेशन आवारात बेवारस स्थितीत माेठ्या प्रमाणात वाहने दिसून आली. यावेळी पाेलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी पाेलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक समिती स्थापन करून अप्पर पाेलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी जिल्ह्यात असलेल्या एकूण बेवारस वाहनांचा आढाव घेतला व बेवारस वाहनांबाबत ज्यांची वाहने असतील, त्यांनी घेऊन जाण्याचे आवाहन केले. तरीही जिल्ह्यातील १३ पाेलीस स्टेशन आवारात असलेल्या बेवारस वाहने पडून राहिल्याने जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी यांनी सदर वाहनांचा लिलाव करण्याची मंजुरी घेतली. त्यानुसार, पाेलीस मुख्यालयात ३६७ बेवारस वाहनांसाठी निविदा मागविण्यात आल्यात. यामध्ये सर्वाधिक निविदा आल्याने बेवारस वाहने बाेलीधारकाच्या ताब्यात देण्यात आल्यात. यामधून आलेली रक्कम शासन दरबारी जमा करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी कळविले.

Web Title: 10 lakh of 367 unattended vehicles deposited with the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.