सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले १0 सिंचन प्रकल्प

By Admin | Updated: July 31, 2014 02:09 IST2014-07-31T02:01:52+5:302014-07-31T02:09:26+5:30

अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील दहा सिंचन प्रकल्पांची कामे तब्बल दीड वर्षांपासून रखडली आहेत.

10 irrigation projects that have failed due to improved administrative approval | सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले १0 सिंचन प्रकल्प

सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले १0 सिंचन प्रकल्प

संतोष येलकर / अकोला
पाटबंधारे विभागाच्या अकोला मंडळातील अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील दहा सिंचन प्रकल्पांची कामे, सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी तब्बल दीड वर्षांपासून रखडली आहेत. सिंचनाचा मोठा अनुशेष असलेल्या भागातील प्रकल्पांसंदर्भातील शासनाची ही अनास्था, विदर्भ विकासाप्रतीच्या शासनाच्या प्रतिबद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.
विदर्भातील सिंचनाच्या अनुशेषासंदर्भात प्रचंड ओरड झाल्यानंतर, विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याकरिता सिंचन प्रकल्पांच्या कामांना प्राधान्य दिले जात असून, निधीदेखिल उपलब्ध करुन दिला जात आहे. पाटबंधारे विभागाच्या अकोला मंडळांतर्गत येणार्‍या अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये विविध सिंचन प्रकल्पांची कामे सुरु करण्यात आली आहेत; मात्र सुधारित प्रशासकीय प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने, या तीनही जिल्ह्यातील दहा सिंचन प्रकल्पांची कामे गेल्या दीड वर्षांपासून ठप्प झाली आहेत. तब्बल ६,९८३ हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या दहा सिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी ३९२ कोटी ५९ लाखांचा निधी मंजूर झालेला असला तरी, शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली नसल्याने, या सिंचन प्रकल्पांची कामे रखडली आहेत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील चार आणि वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी तीन सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे.
पाटबंधारे विभागाच्या अकोला मंडळांतर्गत, अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातील दहा सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे. शासनाकडून लवकरच या सिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त होणार आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लागतील, असे पाटबंधारे विभागाचेप्रभारी अधीक्षक अभियंता ए. एन. पराते
यांनी सांगीतले.
सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडलेले १0 प्रकल्प!
अकोला जिल्हा
शहापूर लघु पाटबंधारे योजना                १३७३१४६ कोटी
कवठा-शेलू ल.पा.योजना                         २८५१0 कोटी
वाई ल.पा.योजना                                १0३६ ९३ कोटी
पोपटखेड ल.पा.योजना                          १00६६४ कोटी

वाशिम
सुरखंडी ल.पा. योजना                           ४२५१२ कोटी
कुत्तरडोह ल.पा.योजना                         ३७९१७ कोटी
धारपिंप्री ल.पा.योजना                           २७१0८ कोटी

बुलडाणा
लोणवळी ल.पा.योजना                            २७४१२ कोटी
दिग्रस कोल्हापूरी बंधारा                        ६0६0६ कोटी ५९ लाख
बोरखेडी ल.पा.योजना                                १३0८२४ कोटी
एकूण                                         ६९६३ ३९२ कोटी ५९ लाख

Web Title: 10 irrigation projects that have failed due to improved administrative approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.