ट्रक मोटार सायकल अपघातात १ ठार

By Admin | Updated: December 9, 2014 23:39 IST2014-12-09T23:39:46+5:302014-12-09T23:39:46+5:30

एक गंभीर : गणेशपूरनजिक घटना.

1 killed in truck motorcycle accident | ट्रक मोटार सायकल अपघातात १ ठार

ट्रक मोटार सायकल अपघातात १ ठार

किन्हीराजा (वाशिम) : नागपूर मुंबई हायवेवर किन्हीराजा पासून पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या गणेशपूर येथे ट्रक व मोटार सायकल अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना ९ डिसेंबर रोजी १२ ते १२.३0 वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनूसार कसनदास रतन राठोड अंदाजे वय ५0 वष्रे रा.उमरदरी व बाबाराव रावजी जाधव रा.राजनखेडे ५0 वष्रे हे दोघे उमदरी येथून शेलुबाजारकडे जात असतांना एम.एच.३0 आर. ५५३0 या मोटार सायकलला मालेगाव कडून मागून येणार्‍या ट्रक क्र.एम.एच. १२ डि.टी. ६७१३ या क्रमांकाच्या ट्रकने धडक दिल्यामुळे मोटार सायकल वरील कसनदास रतन राठोड रा.उमरदरी यांचा जागीच मृत्यू झाला.
तर पाहुणे म्हणून त्यांच्याकडे आलेले राजखेड येथील बाबाराव रावजी जाधव हे या अपघातात गंभीर जखमी झाले व उपचाराकरिता जखमी जाधव यांना पोलिसांनी वाशिम येथे पाठविले आहे . किन्हीराजा पोलिस चौकीच कैलास राठोड, कोहर व इतर सहाकर्‍यांनी मृतकाला शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून सदर ट्रकचा चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेवून जऊळका पोलिस स्टेशन मध्ये लावण्यात आला.

Web Title: 1 killed in truck motorcycle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.