अपघातात १ ठार
By Admin | Updated: November 12, 2014 23:13 IST2014-11-12T23:13:35+5:302014-11-12T23:13:35+5:30
कारंजा-मुर्तिजापूर मार्गावर वालई फाट्यानजिकची घटना; ४ गंभीर जखमी.

अपघातात १ ठार
कारंजा लाड (वाशिम): सोयाबीन कुटार भरण्यासाठी मजूर घेऊन जात असलेले मिनी टाटा ४0७ रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडावर आदळल्याने १ ठार तर ४ गंभीर जखमी झाल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील वालई फाट्यानजिक घडली.
प्राप्त माहितीनुसार स्थानिक बिबीसाबपुरा येथील शे.कलीम शे.हबीब (१६), शेख सलीम शेख हबीब (१९), शेख मुजीब शे.फरीद (३२), सैय्यद मुनाफ सैय्यद हसन (४0) व सैय्यद कदीर सैय्यद हसन (३0) हे सर्व मिनी टाटा ४0७ एमएच १२-६४0३ ने कुटार भरण्यासाठी जात असताना मूर्तिजापूर मार्गावरील वालई फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर वाहन रस्त्याच्या कडेला असणार्या झाडावर जोरदार आदळले. त्यात कॅबिनमध्ये बसलेले सर्व मजूर गंभीर जखमी झाले तर सैय्यद कदीर सैय्यद हसन जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच सर्वधर्म आपतकालीन संस्थेचे श्याम सवाई व इतर सहकार्यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांना कारंजा ग्रामीण रूग्णालया त उपचारार्थ दाखल केले. यावेळी कय्यूम जट्टावाले, मोहम्मद मुन्नीवाले, श्याम घोडेस्वार आदींनी अपघातग्रस्तांना मदत केली व जखमी रूग्णांना अकोला येथे पाठविण्यात आले. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुंभार करीत आहे.