शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

टँकरपुरवठ्यात भेदभाव : युवासेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 01:52 IST

संपूर्ण जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना फक्त काही गावांतच पाण्याचे टँकर पुरवले जात आहेत.

पालघर  - संपूर्ण जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना फक्त काही गावांतच पाण्याचे टँकर पुरवले जात आहेत. तसेच, दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करावा, या मागणीसाठी मंगळवारी युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा आदी तालुक्यांत मागील पाण्याची तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फक्त काही गावांतच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचा आरोप करत युवासेनेच्या नेतृत्वाखाली शेकडो तहानलेल्या ग्रामस्थांनी, सेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी जश्विन घरत, धनंजय मोहिते, राकेश पाटील, पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, उपसंपर्कप्रमुख केतन पाटील, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण, राजेश शहा, ज्योती मेहेर, वैदेही वाढाण, परीक्षित पाटील, राहुल लोंढे, हेमंत धर्ममेहेर, सिद्धेश घरत आदी उपस्थित होते.जिल्ह्यात जव्हार, विक्रमगड, मोखाडा व वाडा या आदिवासी पट्ट्यात अवकाळी पडलेल्या पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्हाधिकाºयांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील आणेवारी ५० पैशांपेक्षा खाली गेल्याचे निदर्शनास आल्याने संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त झालेला आहे. ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण चांगले असताना पाणी साठवण्यास शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत इथले पाणी शहराकडे पळवले जाते. ही वास्तवता आदित्य ठाकरे यांना कळल्यानंतर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.सेना पदाधिकारी पोलिसांमध्ये बाचाबाचीमोर्चादरम्यान जिल्हाधिकाºयांना भेटणाºया शिष्टमंडळात फक्त पाच जणांना प्रवेश दिला जात असल्याचे आदेश असल्याने सेनेचे पदाधिकारी आणि सातपाटी सागरी पोलिसात बाचाबाची झाली. यावेळी कोकण विकास पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनाही आडवण्यात आले होते.युवासेनेचा मोर्चा असताना युवा पदाधिकाºयांना डावलून सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यास गेल्याने युवांनी नाराजी व्यक्त केली.मुंबईला पाणी नेण्यात दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचा तीव्र विरोध मोखाड्यातील कार्यक्र मातून हेतुपुरस्सर दूर ठेवण्यात आल्याने ते अत्यंत संतप्त झाले होते. माझ्या भागातील पाण्याशिवाय तुमचे महामुंबईचे स्वप्न साकार होतेच कसे, हे मी पाहतो, असा गर्भित इशारा त्यांनी दिला होता.ज्या मोखाड्यातील मध्य वैतरणा धरण प्रकल्पाचे पाणी मुंबईला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नेण्यात आले. त्याच मोखाड्यातील ७ गावे व १३ पाडे आज तहानेने व्याकूळ असल्याने टँकरचे पाणी पीत आहेत. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचे पाणी मुंबईत नेले जाते, त्या गावांच्या तहानलेल्या लोकांसाठी सेनेने काय व्यवस्था केली, असा प्रश्नही यावेळी उपस्थित होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर