फ्रेंडशिप डे साजरा करायला गेलेल्या युवकाचा रोडखड धरणात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 12:06 IST2021-08-02T12:03:34+5:302021-08-02T12:06:53+5:30
सफाळे येथील रोडखड धरणाजवळ फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी तन्मेष विकास तरे (१७) याचा धरणात बुडून मृत्यू झाला.

फ्रेंडशिप डे साजरा करायला गेलेल्या युवकाचा रोडखड धरणात बुडून मृत्यू
पालघर : सफाळे येथील रोडखड धरणाजवळ फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी तन्मेष विकास तरे (१७) याचा धरणात बुडून मृत्यू झाला.
एडवन येथील १६ ते १७ विद्यार्थी फ्रेंडशिप साजरा करण्यासाठी रविवारी दुपारी सफाळेजवळील रोडखड धरणाजवळ जमले होते. यातील काही मुलांसह तन्मेष हा पाण्यात उतरला आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. त्याचे अनेक सहकारी मित्र हे सेल्फी काढण्यात इतके मश्गूल होते की, आपला मित्र पाण्यात कधी बुडाला याचा थांगपत्ता त्यांना लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. काही वेळेनंतर तन्मेष सोबत नसल्याने सर्वांच्या लक्षात आल्यावर तो पाण्यात बुडल्याचे लक्षात आले. स्थानिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सफाळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.