बेडरूमच्या छताचा स्लॅब अंगावर पडल्याने तरुणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:41 IST2023-11-02T14:41:01+5:302023-11-02T14:41:55+5:30
विरारमध्ये बेडरूम मधील छताचा स्लॅप अंगावर पडल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बेडरूमच्या छताचा स्लॅब अंगावर पडल्याने तरुणीचा मृत्यू
नालासोपारा (मंगेश कराळे) : विरारमध्ये बेडरूम मधील छताचा स्लॅप अंगावर पडल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनवेलपाड्याच्या रॉयल पब्लिक स्कूल जवळ, सी एम नंगर येथे असलेल्या दादू प्लाझा इमारतीतील ही घटना आहे.
रूम नंबर १०२ मध्ये राहणाऱ्या शितल शिवाजी पवार (३४) ही तरुणी बुधवारी संध्याकाळी आठच्या सुमारास घरात बेडरूममध्ये झोपलेली असताना बेडरूमच्या छताचा स्लॅबचा काही भाग तिच्या अंगावर कोसळून ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला तात्काळ चंदनसार येथील श्री जीवदानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान शितल हिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी तिचे नातेवाईक अमित सोलंकी यांनी विरार पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सदर दादू प्लाझा ही इमारत दहा वर्षे जुनी असल्याची माहिती समोर येत आहे.