तरुणास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 05:20 IST2018-08-07T05:20:43+5:302018-08-07T05:20:46+5:30

एका तरुणाला फेसबुकवरील मुलीशी केलेली मैत्री महागात पडली.

The young man suffocated | तरुणास बेदम मारहाण

तरुणास बेदम मारहाण

नालासोपारा : एका तरुणाला फेसबुकवरील मुलीशी केलेली मैत्री महागात पडली. मुलीच्या वडिलाने मुलाचे अपहरण करत त्याला शनिवारी बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंकित गुप्ताचे हनुमाननगर परिसरातल्या एका मुलीशी फेसबुकवर ओळख झाली. दोघांनी नंबर देऊन चॅटिंग सुरू केले. गेल्या गुरुवारी संध्याकाळी अंकित भार्इंदरला गेला होता. या वेळी मुलीने नालासोपाऱ्याच्या पाटणपार्क येथील स्टेट बँकेजवळ भेटण्यासाठी मेसेज पाठविला. त्याप्रमाणे तो शनिवारी तेथे गेला. त्या वेळी मुलीचे वडील सुनिल गुप्ता व रितेश तिवारी यांनी त्याला गुरुकुल सोसायटीजवळ नेले. तेथे आधीच उपस्थित असलेल्या सुनिल गुप्ताचे सहकारी धिरज दुबे, अनिस खान, राम कनौजिया, दिवेश दुबे व सचिन दुबे यांनी धमकी देत मारहाण केली. दुबेविरोधात गुन्हा दाखल असून त्याचा साथीदारांचा शोध सुरू आहे.

Web Title: The young man suffocated