नालासोपारा : ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये जॅकपॉट लागला असल्याचे सांगून गेल्या दीड महिन्यात एका १५ वर्षीय मुलाला लाखो रुपयांना फसवल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हनुमाननगर परिसरात राहणाऱ्या मनीष झाच्या मोबाइलवर १ आॅगस्ट रोजी एक फोन आला. आपण ‘कौन बनेगा करोडपती’ येथून बोलत असून तुम्हाला २५ लाख रुपयांचा जॅकपॉट लागल्याचे सांगितले. जीएसटी म्हणून सर्वात प्रथम २० हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर कारणाने २ लाख ८० हजार रुपये वेगवेगळ्या दिवशी खात्यावर जमा केले आहे. संबंधित व्यक्ती सतत पैसे मागत असल्याने मनिषच्या मनात शंका आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सोमवारी पोलिसांत त्याने गुन्हा दाखल केला.
‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाने तरुणाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:52 IST