जामसर,सारसून, हातेरी रस्त्याचे काम अर्धवट

By Admin | Updated: January 9, 2017 05:53 IST2017-01-09T05:53:56+5:302017-01-09T05:53:56+5:30

या तालुक्यातील जामसर- सारसून- हातेरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवले असून सार्वजनिक

The work of Jamsar, Sarasun, Hateri road is half-way | जामसर,सारसून, हातेरी रस्त्याचे काम अर्धवट

जामसर,सारसून, हातेरी रस्त्याचे काम अर्धवट

जव्हार : या तालुक्यातील जामसर- सारसून- हातेरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवले असून सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
नाशिक जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता असून तोच वावर मार्गे ^ ^^‘सावरपाडा एक्स्प्रेस’ धावपटू कविता राऊत हिच्या गावाकडेही जातो. या रस्त्यावरून नाशिक, हरसूलकडे रोज शेकडो वाहने ये-जा करतात. त्यांची या अर्धवट कामामुळे कोंडी होते आहे. हे काम गेल्या आठवडाभरापूर्वी करण्यात आले आहे. मात्र खड्डे अपूर्ण बुजविले असून आॅइलमिक्स डांबर वापरण्यात आल्याने आठवडाभरातच डांबर निघायला सुरवात झाली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने लक्ष घालून हे खड्डे बुजवावेते अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The work of Jamsar, Sarasun, Hateri road is half-way