कर्ज देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक , विरार पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:03 AM2017-10-14T04:03:30+5:302017-10-14T04:04:03+5:30

मोदी सरकारने कर्जाची स्कीम सुरु केली असून त्यातून कर्ज मिळवून देतो, असे सांगत विरारमधील अनेक महिलांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

 Women are cheated in the name of lending, Virar police took custody of three people | कर्ज देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक , विरार पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात

कर्ज देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक , विरार पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात

Next

वसई : मोदी सरकारने कर्जाची स्कीम सुरु केली असून त्यातून कर्ज मिळवून देतो, असे सांगत विरारमधील अनेक महिलांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
विरारमधील अंबिका रोजगार संस्था असे तिचे नाव आहे. मनवेल पाड्याच्या उषा पाटील यांनी चंदनसार येथील संस्थेच्या कार्यालयात जाऊन कर्जासाठी अर्ज केला. तेव्हा प्रोसेसिंग फी पोटी पाच हजार रुपये घेतले. पंधरा दिवसांनी आणखी पाचशे रुपये घेण्यात आले. शेवटी कर्जाचा चेक घेण्यासाठी वीस हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतरही रक्कम न मिळाल्याने त्यांनी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता गायकवाड यांच्याकडे विचारणा केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यांनी अंबिका रोजगार संस्थेच्या कार्यालयात धाव घेतली. त्यावेळी कागदपत्रांची तपासणी केली असता संस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांची फसवणूक केल्याचे उजेडात आले.

Web Title:  Women are cheated in the name of lending, Virar police took custody of three people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.