शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महिलादिनीच प्रसूतीसाठी महिलेची ५ तास धावपळ; डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपजिल्हा रुग्णालयातून पाठवले खासगी रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 10:44 IST

डहाणू उपजिल्हा रुग्णालयात रविवारी मध्यरात्री प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आणि जोखमीची प्रसूती असल्याचे सांगत अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला.

बोर्डी/पालघर : डहाणू उपजिल्हा रुग्णालयात रविवारी मध्यरात्री प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आणि जोखमीची प्रसूती असल्याचे सांगत अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला. मात्र मध्यरात्री रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने रिक्षा शोधण्यापासून कुटुंबीयांना पाच तास धावाधाव करून खासगी रुग्णालयात नेऊन प्रसूती करण्याची वेळ आली. 

डहाणू शहरातील वडकून येथे राहणाऱ्या दर्शना माच्छी (२५) या दुसऱ्या खेपेच्या गर्भवतीला शनिवारी रात्री प्रसूतीकळा सुरू झाल्यावर कुटुंबीयांनी तिला डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र जोखमीच्या प्रसूतीसाठी गुजरात राज्यात नेण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला. तसेच रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने उशीर होईल, अशी माहिती देण्यात आल्याने नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. गर्भवतीच्या कुटुंबीयांनी १०८ नंबरवर कॉल करून रुग्णवाहिकेची नोंदणी केली. मात्र सेवेसाठी किमान दीड दोन तास लागतील, असे उत्तर मिळाले. यानंतर अंगणवाडी सेविका आणि स्थानिकांच्या मदतीने महिलेला खासगी रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ सुरू केली. 

नातेवाइकांकडून संताप व्यक्त 

संबंधित महिला मागील नऊ महिन्यांपासून कॉटेज रुग्णालयात नियमित तपासणी आणि उपचार घेत होती. मात्र ऐन प्रसूतीच्या वेळी सरकारी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने तिला अशा प्रकारे धावपळ करण्याची वेळ ओढवल्याने नातेवाइकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

विशेष म्हणजे मध्यरात्र उलटून महिला दिनाच्या शुभेच्छांना सोशल मीडियावर सुरुवात झाली असताना दर्शना मात्र डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे प्रसूतीसाठी कळवळत होती. जिल्हा निर्मितीला १२ वर्षे झाली. मात्र  आरोग्य व्यवस्था अद्यापही बळकट झालेली नाही, अशी टीका यानिमित्ताने नातेवाइकांकडून करण्यात आली.  

...अन् गोंडस बाळाचा जन्म

सर्वप्रथम एका खासगी रुग्णालयामध्ये नेले; मात्र तेथेही डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. नंतर अन्य रुग्णालयातही डॉक्टर उपलब्ध नसल्याने शेवटी त्या महिलेला तिसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार करत महिलाची सिझेरियन प्रसूती केली. या प्रसूतीत ३.१७० किलो वजनाच्या बाळाचा जन्म झाला असून, आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.

मी स्वतः रुग्णालयात जाऊन या घटनेची चौकशी करणार आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.डॉ. रामदास मराड, जिल्हा शल्यचिकित्सक, पालघर

दोन दिवसांपूर्वी अपघातात जखमी वाणगाव येथील पाच महिन्यांच्या गर्भवती आदिवासी महिलेला या उपजिल्हा रुग्णालयात उपचारापासून वंचित ठेवले होते. अखेर खासगी रुग्णालयात मध्यरात्री दाखल करावे लागले. उपचार मिळावेत म्हणून आम्हाला झगडावे लागले.संदेश पाटील, समाजसेवक, डहाणू

English
हिंदी सारांश
Web Title : Woman's Labor Day ordeal: No doctor, rushed between hospitals.

Web Summary : On Women's Day, a pregnant woman faced a harrowing five-hour ordeal due to the unavailability of doctors at a Dahanu hospital. She was forced to move between private hospitals before finally delivering a healthy baby via C-section. Authorities have promised an investigation.
टॅग्स :palgharपालघर