डंपरच्या टायरखाली चिरडून महिलेचा मृत्यू; तुळींज रोडवरील शुक्रवारी दुपारची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 18:26 IST2023-03-31T18:26:08+5:302023-03-31T18:26:36+5:30
या अपघातानंतर डंपर चालकाला पकडून पोलिसांनी डंपर जप्त केला आहे.

डंपरच्या टायरखाली चिरडून महिलेचा मृत्यू; तुळींज रोडवरील शुक्रवारी दुपारची घटना
नालासोपारा (मंगेश कराळे) - तुळींज रोडवरील राधाकृष्ण हॉटेलसमोर रस्त्यावर डंपरच्या टायरखाली चिरडून एका ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर डंपर चालकाला पकडून पोलिसांनी डंपर जप्त केला आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील राधाकृष्ण हॉटेलसमोर रस्त्यावर शुक्रवारी साडे चार वाजण्याच्या सुमारास विलीब्रेड शाळेत काम करणाऱ्या प्रमिला रहाटे (३८) या रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्याचवेळी भरधाव वेगातील येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, महिलेचे डोके मागच्या चाकाखाली गेले आणि तिचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. मात्र, तुळींज पोलीस ठाण्याच्या पथकाने मृतदेह पंचनामा करण्यासाठी पाठवून आरोपी डंपर चालकाला ताब्यात घेतल्यानंतर घटनास्थळी वाहतूक सुरळीत करत आहे.