शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: मतदार जिल्ह्यात बदल घडवणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 06:06 IST

Maharashtra Election 2019: नालासोपारा, बोईसरकडे लक्ष; ५३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

- हितेन नाईकपालघर : भाजप - सेनेतील अंतर्गत धुसफूस, वाढलेली दरी आणि बाहेरून आयात केलेले उमेदवार यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी पाहता २०१४ ची पुनरावृत्ती पालघर जिल्ह्यात दिसणार की नाही, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप - सेनेला पालघर, डहाणू, विक्रमगड या तीन जागा मिळवण्यात यश आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा वसई या सहा मतदारसंघात गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

डहाणू मतदारसंघात एकूण दहा उमेदवार रिंगणात असले तरी भाजपचे विद्यमान आ. पास्कल धनारे विरुद्ध माकपचे विनोद निकोले यांच्यातच खरी लढत आहे. इथे धनारे यांच्याविरोधात मोठी नाराजी असून याचा फटका त्यांना बसतो का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. येथे ६०.९६ टक्के म्हणजे १ लाख ६५ हजार ८६५ इतके मतदान झाले आहे.

मागच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीपेक्षा महाआघाडीला ८ हजार १४७ मते जास्त मिळाली होती. यावेळी निकोले यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीची साथ मिळाली आहे. शिवाय, लोकसभा निवडणुकीनंतरच्या सहा महिन्यांमध्ये मतदारसंघात विशेष घडामोडी घडल्या नसल्याने निकोले हे सत्ताधाऱ्यांना धक्का देऊ शकतात अशी चर्चा आहे.

विक्रमगडमध्येही १० उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजपचे डॉ. हेमंत सवरा आणि राष्ट्रवादीचे सुनील भुसारा यांच्यात होणार आहे. पालघर जिल्ह्यात या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ६८.५१ टक्के एवढे मतदान झाले आहे. आदिवासी विकासमंत्री आणि पालकमंत्री म्हणून विष्णू सवरा यांच्या रूपाने या विधानसभा क्षेत्राला वजनदार नेते मिळाले असतानाही या मतदारसंघाचा विकासच झाला नसल्याचे वास्तव विरोधकांनी मतदारापुढे मांडण्यात यश मिळवले आहे. इथे भाजपत झालेली बंडखोरी वरवर शमल्यासारखी वाटत असली आतून ही आग धुमसते आहे.

तर दुसरीकडे भाजप- शिवसेनेत असलेली धुसफूस भाजप उमेदवाराला धोकादायक ठरू शकते. शिवसेनेचे जि.प. सदस्य प्रकाश निकम हे २०१४ च्या निवडणुकीत दोन नंबरवर होते. सध्या ते सेनेतून भाजपमध्ये गेले असले तरी भविष्यातील उमेदवारीच्या दाव्याचे गणित पाहता त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.

पालघरमध्ये एकूण पाच उमेदवार रिंगणात असून शिवसेनेचे श्रीनिवास वनगा आणि काँग्रेसचे योगेश नम किंवा वंचित आघाडीचे विराज गडाग यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. या मतदार संघात २३ गावांनी मतदानावर टाकलेला बहिष्काराचा जास्त प्रभाव सेनेच्या उमेदवारांवर पडण्याची शक्यता असून नोटा चा वापरही जास्त झाल्याची चर्चा आहे. इथे २ लाख ७३ हजार ९९४ मतदार असून अवघे ४७.११ टक्के मतदान झाले आहे. हे जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असला तरी भाजप - सेनेमधील दुही आणि बहिष्काराचे लोण, सक्षम उमेदवार नसल्याचे कारण देत उमेदवारांनी दाखवलेली उदासीनता, या बाबींवर उमेदवारांच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

बोईसर मतदारसंघ हा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असून भाजपचे बंडखोर उमेदवार संतोष जनाठे यांनी मुख्यमंत्र्यांच्या इशाºयानंतरही अपक्ष म्हणून निवडणूक लढवून सेनेच्या नाकी नऊ आणले आहेत. शेवटच्या दोन दिवसात त्यांनी मारलेला जोर आणि भाजपकडून मिळालेली आर्थिक रसद यामुळे ते मुसंडी मारू शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे अपक्ष (भाजप बंडखोर) संतोष जनाठे आणि सेनेच्या विलासर तरे यांच्या लढतीत बविआचे राजेश पाटील बाजी मारतात की पक्ष बदल केल्यानंतर आणि विलास तरे यांना निष्क्रिय उमेदवार ठरविल्यानंतरही मतदार त्यांना पसंती देतात की अन्य पर्याय निवडतात याची उत्सुकता आहे.

२०१४ च्या निवडणुकीत भाजप व सेना उमेदवार स्वतंत्र लढले असतानाही बविआ चे उमेदवार विलास तरे निवडून आले होते. यावेळी ते सेनेतून लढत असले तरी त्यांना भाजपमधून पूर्ण साथ मिळाली नसल्याने सेनेच्या तंबूत घबराट आहे. येथे एकूण ६७.५७ टक्के मतदान झाले आहे. नालासोपारा मतदारसंघात बविआ एकतर्फी जिंकून येत असली तरी यावेळी सेनेने प्रदीप शर्मा या एका सेवानिवृत्त पण वादग्रस्त पोलीस अधिकाºयाला उमेदवारी देत आव्हान उभे केले होते.

सेना - भाजपतील बंडाळी भोवणार?

नालासोपाऱ्यात सेनेच्या मदतीला भाजप पूर्ण ताकदीनिशी नसल्याने सेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे ही जागा भाजपला हवी होती. मात्र, ती शिवसेनेकडे गेल्याची नाराजी होती. याचा फटका प्रचारातही बसलेला दिसला.

वसई मतदारसंघात बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा सामना काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या विजय पाटील यांच्याशी होणार आहे. इथल्या महानगर पालिकेत बविआची एकहाती सत्ता असून इथे सेनेची पक्षबांधणी मजबूत नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019boisar-acबोईसरpalghar-acपालघरdahanu-acडहाणू