पत्नीच्या आत्महत्येचा बनाव पोलिसांनी उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:25 IST2021-01-12T01:25:01+5:302021-01-12T01:25:14+5:30

पतीला अटक : गळा आवळून केली हत्या

The wife's suicide was foiled by the police | पत्नीच्या आत्महत्येचा बनाव पोलिसांनी उधळला

पत्नीच्या आत्महत्येचा बनाव पोलिसांनी उधळला

नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या पत्नीची तिच्याच पतीने नायलॉन दोरीच्या साह्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली आहे. पतीने पोलिसांना पत्नीने आत्महत्या केल्याची तक्रार दिल्यावर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, परंतु पोलिसांना संशय आल्यावर शवविच्छेदन अहवाल आल्यावर, ही हत्या असल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील अलकापुरी येथील आंबेडकरनगरमध्ये दत्ताराम काशीराम तांबे आणि दिया तांबे (२८) हे नवविवाहित जोडपे राहत होते. ७ डिसेंबरला या दोघांनी विवाह केला होता. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी किरकोळ कारणावरून दत्ताराम यांनी पत्नी दिया ही झोपेत असताना, तिचा नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळा आवळून ठार मारले आहे. तिचा भाऊ योगेश एकनाथ नवले (३४) यांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

पत्नीने आत्महत्या केल्याची तक्रार पतीने दिल्यावर अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, पण संशय वाटल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविल्यावर अहवाल आल्यावर पोलीस तपासात चौकशी केल्यावर त्याने हत्येची कबुली दिली आहे. आरोपी पतीला हत्येचा गुन्हा दाखल करून अटक करत वसई न्यायालयात हजर केल्यावर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
- शाहूराज रणावरे, 
तपास अधिकारी, तुळींज पोलीस ठाणे
 

Web Title: The wife's suicide was foiled by the police