शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
3
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
4
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
5
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
6
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
7
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
8
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
9
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
10
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
11
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
12
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
13
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
14
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
15
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
16
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

‘मंगल कार्यालय चोरट्यां’विरुद्ध आदेश देऊनही गुन्हे का नाहीत?

By admin | Updated: October 4, 2016 02:11 IST

विक्रमगड तालुक्यातील खुडेदच्या घोडीचा पाडा येथील ९ लाख ९९ हजार ५३० रुपयाच्या मंगल कार्यालयाची रक्कम हडप केल्याप्रकरणी दोषी असलेल्या

हितेन नाईक,  पालघरविक्रमगड तालुक्यातील खुडेदच्या घोडीचा पाडा येथील ९ लाख ९९ हजार ५३० रुपयाच्या मंगल कार्यालयाची रक्कम हडप केल्याप्रकरणी दोषी असलेल्या अधिकारी, ठेकेदार, सरपंचा विरोधात गुन्हा दाखल करण्याचे पत्र पाच दिवसा पूर्वी जव्हार पोलीस स्टेशनला देऊनही दोषींविरूद्ध गुन्हे दाखल होत नसल्याने पोलिसांचे हात कोणत्या विष्णूने बांधले व कोण आता सवरासावर करतो आहे? या प्रश्नांची जोरदार चर्चा सर्वत्र सुरु आहे. महत्वाचे म्हणजे पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील त्यांच्या खात्यांतर्गत हा लुटीचा प्रकार घडला असतांना ते मौनीबाबा झाले आहेत. व भ्रष्टाचाऱ्यां विरोधात कारवाई होत नसल्याने पारदर्शक सत्तेचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपा शासनकर्त्यांविरोधात मात्र संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहे.आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेतून सन २०१४-१५ मध्ये ९ लाख ९९ हजार ५३० रुपये खर्चाच्या या मंगल कार्यालयाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये हे काम काम कागदोपत्री सुरु झाले आणि ५ जानेवारी २०१६ मध्ये त्या पाड्यात ते मंगल कार्यालय कागदोपत्री बांधून पूर्ण झाले. ज्या विभागाने निधी उपलब्ध करून दिला तो जव्हारचा आदिवासी विकास प्रकल्प विभाग आणि ज्या विभागाने हे काम पूर्ण केले त्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे आणि उपकार्यकारी अभियंता सुदाम ससाणे यांनी कागदोपत्री अहवालही सादर केला होता. त्याला सत्यता आणण्यासाठी भलत्याच इमारतीला ती या कार्यालयाची आहे असे भासविणारे छायाचित्रही सादर केले होते.मात्र वरील मंगल कार्यालय बांधलेच गेले नसल्याने आणि ते चोरीला गेल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्या नंतर आणि या संदर्भात तक्र ारी पुढे आल्यानंतर जव्हारच्या आदिवासी विभागाचे तत्कालीन प्रकल्पधिकारी बाबासाहेब पारधे ह्यांनी ही खुडेद च्या घोडीचा पाड्याला स्वत: भेट देवून चौकशी केली असता मंगल कार्यालय बांधलेच नसल्याचे त्यांना दिसून आले. तसा अहवालही जिल्हाधिकाऱ्यासह वरीष्ठांकडे सादर केला आहे.अशी सुरु आहे सवरासावरसुमारे १० लाखाची इमारत चोरून त्याच्या निधीची वाटणीहि झाल्या नंतर आता कुणाच्याही काहीही लक्षात येणार नाही अशा अविर्भावात वावरणाऱ््या जव्हारच्या आदिवासी प्रकल्प विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार, विक्र मगड आणि ठेकेदाराला लोकमतच्या वृत्ताने मोठी चपराक बसली. मात्र, आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून घोडीच्या पाड्यातील आरक्षित जागेवर मंगल कार्यालय कामीत कमीत वेळात उभारायची स्पर्धाच जणू सुरु झाली होती. अवघ्या आठवडाभराच्या कालावधीत इमारतीच्या चारी बाजूच्या भिंतींची उभारणी सह रंगरंगोटी,फलक लावणे इत्यादी काम पूर्ण झाले आहे.